करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीत अभिनेता सोनू सूद याने गरीबांसाठी मदतीचा हात पुढे केला. देशभरातील शेकडो मजुरांना त्याने रोजगार मिळवून देण्यासाठी मदत केली. शिवाय अलिकडेच त्याने गरीब विद्यार्थांच्या शिक्षणासाठी एका स्कॉलरशिपची देखील घोषणा केली. त्याच्या या दानशुरपणाची सर्वत्र स्तुती होत आहे.

अवश्य पाहा – ये फिटनेस की बात है! पाहा मलायकाचा ‘हॉट योगा’

लॉकडाउनच्या काळात लोक सोशल मीडियावरुन त्याच्याकडे मदत मागत होते. परंतु आता तर थेट चित्रपटाच्या सेटवर जाऊन त्याची भेट घेतली जात आहे. लक्षवेधी बाब म्हणजे सोनू देखील मोठ्या उत्साहाने या गरीबांची भेट घेऊन त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. गरीबांची मदत करण्याऱ्या सोनूचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – फॅट ‘गंगूबाई’चा फिट अवतार; ८ महिन्यात २२ किलो वजन केलं कमी

अवश्य पाहा – ‘आमच्या भावनांशी खेळ नकोस’; दया बेनच्या त्या फोटोंवर चाहते संतापले

सोनू सूदने लॉकडाउनच्या काळात विविध ठिकाणी अडकलेल्या देशभरातील शेकडो मजुरांना आणि विद्यार्थ्यांना बस आणि ट्रेनच्या माध्यमातून त्यांच्या गावी पोहोचवलं आहे. शिवाय त्यांच्या रोजगारासाठीही तो प्रयत्न करत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही सोय तो विनामुल्य देत आहे. “शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही.” असं त्याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. आनंदाची बाब म्हणजे या वाक्याचे तो तंतोतंत पालन करत आहे. यापूर्वी सोनुने १५०० PPE किट्सची मदत केली होती. तसेच आपले हॉटेल करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खुले करुन दिले होते.