News Flash

परदेशातही सोनू सूदचे ‘मिशन घर भेजो’; ‘या’ देशातून भारतीयांना आणणार मायदेशी

आता विदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांना सोनू सूद पोहोचवतोय घरी

करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरातील लोक सध्या त्रस्त आहेत. या प्रतिकूल परिस्थितीत सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला. मात्र यामध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती अभिनेता सोनू सूदची. त्याने देशभरातील शेकडो मजुरांना आणि विद्यार्थांना ट्रेन व बसच्या माध्यमातून त्यांच्या गावी पोहोचवले. त्याच्या या मदतीची सर्वत्र स्तुती होत आहे. मात्र तो एवढ्यावरच थांबलेला नाही. आता त्याने आपलं लक्ष विदेशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थांकडे वळवलं आहे. अलिकडेच त्याने किर्गिस्तानमध्ये अडकलेल्या विद्यार्थांना भारतात आणलं होतं. आता तो जॉर्जियामधील विद्यार्थांना भारतात आणण्याची तयारी करत आहे.

अवश्य पाहा – लष्करातील नोकरी सोडून या अभिनेत्रीनं केलं बॉलिवूडमध्ये करिअर

अवश्य पाहा – “सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा”; मोदींनी दिलं भाजपा खासदाराच्या पत्राला उत्तर

“जॉर्जियामध्ये अडकलेल्या ५० पेक्षा अधिक विद्यार्थांना मदतीची गरज आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन सोनूकडे मदतीची विनंती करण्यात आली होती. या ट्विटची नोंद घेत विद्यार्थांच्या मदतीसाठी सोनूने तयारी सुरु केली आहे. याबाबात त्याने ट्विट करुन माहिती दिली. त्याच्या या ट्विटवर सोशल मीडियाद्वारे कौतुकाचा वर्षाव होत आहे.

काही दिवसांपूर्वी सोनूने एक पोस्ट शेअर करत किर्गिस्तानमध्ये अडकलेल्या ३ हजार विद्यार्थ्यांना पुन्हा मायदेशी घेऊन येणार असं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार, त्याने या स्पाइस जेटच्या मदतीने यातील १५०० विद्यार्थ्यांना भारतात आणलं आहे. यातील काही फ्लाइट्स गुरुवारी रात्री उशीरा वाराणसी विमानतळावर पोहोचल्याचं त्याने सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2020 12:29 pm

Web Title: sonu sood help students who stuck in georgia mppg 94
Next Stories
1 ‘K.G.F 2’मधील संजय दत्तचा फर्स्ट लूक येणार या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला
2 फ्रीमध्ये परफॉर्म केल्यास अवॉर्ड देण्याची दिली होती ऑफर- अदनान सामी
3 लॉकडाउनचं बक्षीस घेताय का?; हजारो रुपये वीजेचं बिल पाहून अभिनेत्री संतापली
Just Now!
X