22 September 2020

News Flash

सोनू सूदने केली २२ वर्षीय मुलीला गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत

सोनू सूदने ट्विटरद्वारे अनेकांना मदत केली आहे.

करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये अनेक सेलिब्रिटींनी जमेल त्या पद्धतीने लोकांना मदत केली. अशातच सर्वाधिक चर्चा रंगल्या त्या म्हणजे अभिनेता सोनू सूदने केलेल्या मदतीच्या. सोनू सूद सतत चाहत्यांना मदत करताना दिसत आहे. मग ते एखाद्या नोकरी गेलेल्या मुलीला नोकरी देणे असो किंवा शेतात मुलींच्या सहाय्याने नांगर फिरवणाऱ्या गरीब शेतकऱ्याला ट्रॅक्टर देणे असो. आता त्याने एका २२ वर्षीय मुलीला गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत केली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूर येथे राहणाऱ्या २२ वर्षीय प्रज्ञा मिश्राला सोनू सूदने मदत केली आहे. तिचे वडिल गोरखपूर येथील स्थानिक मंदिराचे पुजारी आहेत. लॉकडाउनमुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले होते. अशातच प्रज्ञाच्या पायाला दुखापत झाली होती आणि डॉक्टरांनी तिला गुडघा प्रत्यारोपण श्स्त्रक्रिया करण्यास सांगितली होती. त्यासाठी लागणारे पैसे प्रज्ञाकडे नसल्यामुळे तिने सोनू सूदकडे मदत मागितली होती.

‘सोनू सूद सर कृपया माझी मदत करा. मी गेली कित्येक दिवस तुमच्याकडे मदत मागत आहे. मला अपंग होण्यापासून वाचवा’ असे म्हणत प्रज्ञाने तिचे डॉक्टरांनी दिलेले प्रिस्क्रिप्शन शेअर केले होतो. सोनू सूदने तिचे ट्विटपाहून तिला लगेच मदत केली. ‘माझे तुझ्या डॉक्टरांशी बोलणे झाले आहे. तुझी शस्त्रक्रिया पुढच्या आठवड्यात होणार आहे. लवकर बरी हो’ असे सोनू सूदने ट्विटमध्ये म्हटले होते.

सोनू सूदने मदत केल्यानंतर प्रज्ञाने सोशल मीडिया पोस्टद्वारे त्याचे आभार मानले आहेत. ‘आई असे म्हणते की देव हा जमिनीवरच असतो. आज मला आईचे म्हणणे पटले. जेव्हा सर्व नातेवाईकांनी मदत करण्यास नकार दिला तेव्हा तुम्ही मदतीचा हात पुढे केलात. तुमचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. तुम्हीच मला नवीन आयुष्य दिले आहे’ असे तिने ट्विटमध्ये म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2020 11:21 am

Web Title: sonu sood helps 22 year old up girl to get knee replacement surgery avb 95
Next Stories
1 Birthday Special : जॉनी लिवर यांचे खळखळून हसवणारे हे व्हिडिओ बघाच
2 ‘आशिकी’ फेम राहुल रॉयला पोलिसांनी मारले? व्हायरल झाला फोटो
3 …म्हणून जॉनी लिवर यांना झाला होता तुरुंगवास?
Just Now!
X