News Flash

‘मदत करतो,पण त्या बदल्यात…’; रिक्षाचालकाचा मदत करणाऱ्या सोनू सूदने मागितला मोबदला

रिक्षाचालकाच्या शस्त्रक्रियेचा खर्च करणाऱ्या सोनू सूदने मागितला मोबदला, म्हणाला...

गेल्या कित्येक महिन्यांपासून अभिनेता सोनू सूद सातत्याने अडचणीत असलेल्या गरजुंची मदत करत आहे. सोनू सूदचा मार्च महिन्यापासून सुरु झालेला मदतीचा ओघ अजूनही कायम आहे. यामध्येच आता त्याने एका रिक्षा चालकाच्या शस्त्रक्रियेचा खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या बदल्यात त्याने रिक्षाचालकाकडे एक खास मागणी केली आहे.

एक रिक्षाचालक अपघातामध्ये जखमी झाला असून त्याच्या हाताची शस्त्रक्रिया करायची आहे. तसंच ही शस्त्रक्रिया वेळीच झाली नाही तर या रिक्षाचालकाला त्याचा हात कायमचा गमवावा लागेल. परंतु, आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे या रिक्षाचालकाला शस्त्रक्रियेचा खर्च करणं शक्य नाही. मात्र, या चालकाची ही अडचण सोनू सूदने दूर केली आहे. सोनूने या शस्त्रक्रियेचा खर्च करणार असल्याचं सांगितलं असून त्याबदल्यात एक छान मोबदलाही मागितला आहे.

“हात कसा काय गमावू देणार? तुमची शस्त्रक्रिया १२ ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे फक्त कधीतरी तुमच्या रिक्षातून एक फेरी द्या”, असं ट्विट सोनू सूदने केलं आहे.

दरम्यान, सोनू सूद सातत्याने गरजुंची मदत करत आहे. आतापर्यंत त्याने अनेकांच्या राहण्याची, व्यवसायाची सोय केली आहे. तसंच अनेक विद्यार्थ्यांना तो शैक्षणिक मदतदेखील करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 12:28 pm

Web Title: sonu sood helps an injured auto driver asks for this in return ssj 93
Next Stories
1 “सगळ संपलं, आता घरी चला”, रिया चक्रवर्ती जेलमधून बाहेर येताच शेखर सुमनने केले ट्विट
2 Video : लग्नाविषयीची ‘ही’ गोष्ट आजही आईला माहित नाही; चिन्मयच्या लव्हस्टोरीतला भन्नाट किस्सा
3 १ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकताच पायलची माघार; ‘या’ अभिनेत्रीची माफी मागण्यास तयार