15 July 2020

News Flash

देवाऱ्यात फोटो ठेवून आरती करणाऱ्या चाहत्याला सोनू सूद म्हणाला…

पाहा व्हिडीओ

गेल्या काही दिवासांपूर्वी सोनू सूद अनेक मजदूर कामगारांना त्यांच्या घरी पोहचवण्यास मदत करत होता. त्यासाठी त्याने आणि त्याच्या संपूर्ण टीमने ट्विटरवर त्याचा फोन नंबर दिला होता. तसेच त्याने अनेक कामगारांना ट्विटरद्वारे मदत केली आहे. अशातच अनेकांनी सोनूला मजेशीर ट्विट करत काही प्रश्न देखील विचारले होते. आता एका चाहत्याने असे काही केले आहे की सोनूने त्याला असं काही करु नकोस अशी विनंती केली आहे.

ट्विटरवर एका चाहत्याने देवाची आरती करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या व्यक्तीने देवाऱ्यामध्ये सोनू सूदचा देखील फोटो ठेवला आहे आणि तो आरती करताना दिसत आहे. चाहत्याने आरती करतानाचा व्हिडीओ शेअर करत, ‘सोनू सूद, जो आईची भेट घालून देणारा देव आहे. मी तर तुला देवच मानतो. तु माझे स्वप्ने तूटण्यापासून वाचवलेस आणि मला आईकडे सुखरुप पाठवलेस’ असे त्याने कॅप्शन दिले आहे.

सोनू सूदने चाहत्याच्या या ट्विटला उत्तर दिले आहे. त्यात त्याने ‘अरे, असं काही करु नकोस. आईला सांग मला आशिर्वाद द्यायला. सर्वकाही लवकरच ठिक होईल’ असे म्हटले आहे.

Video : सोनू सूदसमोर सर्वात मोठे आव्हान, चिमुकलीने केली अनोखी मागणी

सोनू सूदच्या चाहत्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्यावर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. तसेच अनेक कामगारांनी सोशल मीडियाद्वारे सोनूचे आभार मानले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 8:12 pm

Web Title: sonu sood interesting replies to migrant workers avb 95
Next Stories
1 नताशाचे लग्न आणि आई होण्यावर एक्स बॉयफ्रेंड अली गोणी म्हणाला…
2 ‘ही’ अभिनेत्री सोनू सूदला करतेय मदत; नेटकरी म्हणाले ही तर ‘सुपरवुमन’
3 लॉकडाउनमध्ये मुंबईतील व्हिडीओ शूट करून अभिनेत्री करतेय प्रेक्षकांचं मनोरंजन
Just Now!
X