20 January 2021

News Flash

सोनू सूदने स्वीकारलं चाहतीच्या लग्नाचं आमंत्रण; पोस्ट शेअर करत म्हणाला…

जाणून घ्या सोनू सूद काय म्हणाला..

लॉकडाउनच्या काळात अभिनेता सोनू सूदने असंख्य गरजूंना मदत केली. त्याचे मदतकार्य अजूनही सुरुच आहे. सोनू सूद अनेकांसाठी हिरो झाला आहे. अजूनही काही जण त्याच्याकडे मदतीची मागणी करत आहेत, तर काही जण आपुलकीने त्याला घरातील एखाद्या कार्याचं निमंत्रण देत आहेत. यामध्येच एका मुलीने सोनू सूदला लग्नाची पत्रिका पाठवत लग्नाचं आमंत्रण दिलं आहे. विशेष म्हणजे सोनूनेदेखील या लग्नाला येण्याचं कबूल केलं आहे.

बिहारमधील एका लहानशा गावात राहणाऱ्या एका मुलीने तिच्या लग्नाची पत्रिका खास सोनू सूदला पाठवली असून लग्नाला येण्याचं आमंत्रण दिलं आहे. तिची पत्रिका पाहिल्यानंतर सोनूनेदेखील लग्नाला नक्की येणार असं म्हटलं आहे. “जर तुम्ही माझ्या लग्नाला आलात, तर या जगात सगळ्यात भाग्यवान मुलींपैकी मी एक असेन. सर, मी तुमची वाट पाहीन”, असं ट्विट नेहाने केलं. त्यावर ”चला बिहारमधील लग्नपद्धत कशी असते पाहुयात”, असा रिप्लाय देत सोनून हे आमंत्रण स्वीकारलं आहे.

दरम्यान, सध्या सोनूचं हे ट्विट पाहिल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर पुन्हा एकदा कौतुकाचा वर्षाव केला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी सोनूने नेहाच्या बहिणीच्या शस्त्रक्रियेसाठी मदत केली होती. त्यामुळेच नेहाने सोनूला या लग्नाचं आमंत्रण दिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2020 7:01 pm

Web Title: sonu sood is going to bihar to attend a wedding dcp 98
Next Stories
1 वडिलांसाठी गायक कुणाल शर्माने काढला कपिल शर्माच्या नावाचा टॅट्यू
2 अभिनेत्याला येतेय सुशांतची आठवण; विमानाचं तिकिट पाहून झाला भावूक
3 ‘कालीन भैय्या’ची फॅन आहे ही पाकिस्तानी अभिनेत्री, पोस्ट पाहताच पंकज त्रिपाठी म्हणाले..
Just Now!
X