21 October 2020

News Flash

सोनू सूदच्या कामाचं राज्यपालांकडूनही कौतुक

राज्यपालांनी सोनू सूदला राजभवनावर भेटायला बोलावलं होतं.

सोनू सूद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

स्थलांतरित मजुरांसाठी देवदूत बनलेला अभिनेता सोनू सूद याने शनिवारी राज्यपाल भगरतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांनी सोनू सूदला राजभवनावर भेटायला बोलावलं होतं. या भेटीदरम्यान राज्यपालांनी सोनू सूदच्या कामाचं कौतुक केलं. लॉकडाउनमुळे विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी बसेसची व्यवस्था करून त्यांना सुखरुप घरी पोहोचवण्याचं काम सोनू सूद गेल्या काही दिवसांपासून करतोय.

‘प्रसिद्ध अभिनेते सोनू सूद यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. स्थलांतरित लोकांना त्यांच्या मूळ राज्यात पोहचविण्यासाठी तसेच लाखो लोकांच्या भोजन व्यवस्थेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची सूद यांनी राज्यपालांना माहिती दिली,’ असं ट्विट राज्यपालांनी केलं.

सोनू सूदच्या कामाचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. पडद्यावर क्रूर खलनायक साकारणारा सोनू सूद आता खऱ्या आयुष्यात नायक ठरला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 10:08 am

Web Title: sonu sood meets maharashtra governor ssv 92
Next Stories
1 तापसीच्या आजीचं निधन; लॉकडाउनमुळे झालं नाही अंतिम दर्शन
2 सोनू सूद की सलमान खान?; अभिनेत्याने घेतला Poll; जनता म्हणते…
3 …म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मानले सलमान खानचे आभार
Just Now!
X