24 October 2020

News Flash

“मला लिंबू पाणी दिलं तरच…”; सोनू सूदची अजब अट

फोटो होतोय व्हायरल...

करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीत अभिनेता सोनू सूद याने गरीबांसाठी मदतीचा हात पुढे केला. त्याच्या या दानशुरपणाची सर्वत्र स्तुती होत आहे. दरम्यान एका चाहत्याने सोनूला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. चाहत्याच्या या विनंतीवर सोनूने देखील भन्नाट रिप्लाय दिला आहे.

“सोनूजी मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. आयुष्यात किमान एकदा तरी तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे. पण मला माहिती आहे ही इच्छा कधीही पूर्ण होणार नाही. तरीही किमान एकदा असं म्हणा की आपली भेट होईल.” अशा आशयाचं ट्विट करुन एका चाहत्याने सोनूला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावर सोनूने देखील, “आपण नक्की भेटू पण तुम्ही जे लिंबू पाणी पित आहात ते तुम्हाला माझ्यासाठी घेऊन यावं लागेल.” अशी गंमतीशीर प्रतिक्रिया दिली.

सोनू सूदने लॉकडाउनच्या काळात विविध ठिकाणी अडकलेल्या देशभरातील शेकडो मजुरांना आणि विद्यार्थ्यांना बस आणि ट्रेनच्या माध्यमातून त्यांच्या गावी पोहोचवलं आहे. शिवाय त्यांच्या रोजगारासाठीही तो प्रयत्न करत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही सोय तो विनामुल्य देत आहे. “शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही.” असं त्याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. आनंदाची बाब म्हणजे या वाक्याचे तो तंतोतंत पालन करत आहे. यापूर्वी सोनुने १५०० PPE किट्सची मदत केली होती. तसेच आपले हॉटेल करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खुले करुन दिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 11:30 am

Web Title: sonu sood on lemonade mppg 94
Next Stories
1 ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत नवा ट्विस्ट
2 कुमार सानू यांना करोनाची लागण
3 ..म्हणून हेमा मालिनीशी लग्न करण्यास गिरीश कर्नाड यांनी दिला होता नकार
Just Now!
X