02 March 2021

News Flash

‘मी सोनू सूदवर हात उचलू शकत नाही’, मेगास्टार चिरंजीवी यांचा खुलासा

जाणून घ्या कारण..

लॉकडाऊनच्या काळात आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या लोकांसाठी अभिनेता सोनू सूदने मदतीचा हात दिला. सोनू सूदने कशाचीही पर्वा न करता लोकांना भरभरून मदत केली आणि तो अनेकांसाठी सुपरहिरो ठरला. बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणारा सोनू सूदला आता अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या आहेत. तो एका दाक्षिणात्य चित्रपटात मेगास्टार चिरंजीवी यांच्यासोबत काम करणार आहे. पण ऑनस्क्रीन सोनू सूदला मारणे शक्य नाही असे चिरंजीवी यांनी म्हटले आहे.

नुकताच सोनू सूदने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत असल्याचे सांगितले आहे. ‘मला चित्रपटातील लीड रोलसाठी अनेक ऑफर येऊ लागल्या आहेत. माझ्यासाठी ही एक नवी सुरुवात आहे’ असे सोनू म्हणाला.

पुढे तो म्हणाला, “मी आणि चिरंजीवी सर एक अॅक्शन सीन शूट करत होतो. तेव्हा ते म्हणाले,’आता एखाद्या अॅक्शन सीनमध्ये मी तुझ्यावर हात उचलू शकत नाही’ जर त्यांनी मला मारले तर माझे चाहते नाराज होतील असे ते मला म्हणाले”

सोनू सूद आणि चिरंजीवी लवकरच ‘आचार्य’ या चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. हा चित्रपट तेलुगूमध्ये प्रदर्शित होणार आहे. चाहते या चित्रपटासाठी उत्सुक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2020 1:34 pm

Web Title: sonu sood on shooting with chiranjeevi he refused to hit me on screen avb 95
Next Stories
1 सुशांतचे वडील रुग्णालयात दाखल; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
2 तैमूरच्या वाढदिवसानिमित्त करीनाची खास पोस्ट, “तुझ्या अम्माशिवाय कोणीच..”
3 नेहाला माझं सुख बघवत नाही- आदित्य नारायण
Just Now!
X