03 March 2021

News Flash

‘गुगल ट्रेण्ड’मध्येही सोनू सूद खरा हिरो; अक्षय कुमारला टाकलं मागे

सोनू सूदच्या वॉलपेपरपासून, मूळ गावापर्यंत नेटकरी करतायत गुगल सर्च

सोनू सूद, अक्षय कुमार

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेला अभिनेता म्हणजे सोनू सूद. स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवण्याचं काम सोनू सूद अविरतपणे करत आहे. या मजुरांसाठी त्याने बसेसची, जेवणाची व्यवस्था केली आहे. त्यामुळे पडद्यावर खलनायक साकारणारा हा कलाकार खऱ्या आयुष्यात ‘हिरो’ बनला आहे. मदतीच्या या कामामुळे सोनू सूदच्या गुगल सर्चमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. गुगल ट्रेण्ड्समध्ये त्याने अक्षय कुमारलाही मागे टाकलं आहे.

गुगलवर अक्षय कुमारच्या तुलनेत सोनू सूदचा सर्च वाढला आहे. अंदमान आणि निकोबार, मिझोरम, दमण आणि दीव, अरुणाचल प्रदेश, चंदीगड या ठिकाणी गुगलवर सोनू सूदबद्दल सर्वाधिक सर्च केला गेला आहे. सोनू सूदने काय काम केलं, त्याचा वॉलपेपर, त्याचं मूळ गाव, त्याचा टोल फ्री नंबर असे विविध सर्च नेटकऱ्यांकडून केले जात आहेत.

आणखी वाचा : “सोनू हे काय नाव आहे.. अनेकदा नाव बदलण्याचा विचार मनात आला पण…”

स्थलांतरित मजुरांच्या एक फोन कॉलवर सोनू सूद त्यांची मदत करत आहे. यासाठी त्याची दहा जणांची टीम काम करतेय. त्याच्या या नि:स्वार्थ कामगिरीबद्दल सर्वच स्तरांतून त्याचं कौतुक होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2020 1:58 pm

Web Title: sonu sood rocking in google trends also more than akshay kumar ssv 92
Next Stories
1 “होय त्या स्टंटसाठी घडवला खरा विमान अपघात”; दिग्दर्शकानं दिलं स्पष्टीकरण
2 महिलेने पार्लरमध्ये जाण्यासाठी मागितली मदत; सोनू सूदने दिला भन्नाट रिप्लाय
3 पतीमुळे ‘ही’ अभिनेत्री सिनेसृष्टीपासून गेली दूर; पहिलाच चित्रपट ठरला होता ब्लॉकबस्टर
Just Now!
X