22 October 2020

News Flash

सोनू सूद की सलमान खान?; अभिनेत्याने घेतला Poll; जनता म्हणते…

अभिनेत्याच्या पोलवर जनतेनं दिला थक्क प्रतिसाद

करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरातील लोक त्रस्त आहेत. या प्रतिकूल परिस्थितीत अनेक सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. मात्र या सर्वांमध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती अभिनेता सोनू सूदची. त्यामुळे येत्या दोन वर्षात सोनू सलमान खान पेक्षाही मोठा सुपरस्टार होईल. अशी भविष्यवाणी अभिनेता कमाल खानने केली आहे.

“६५ टक्के लोकांना रुपेरी पडद्यावर सलमान ऐवजी सोनू सूदला पाहायचंय. म्हणजे येत्या दोन वर्षात सोनू सलमान पेक्षाही मोठा सुपरस्टार होईल. फक्त त्याने चांगल्या पटकथा असलेल्या चित्रपटांमध्ये काम करायला हवे.” अशा आशयाचे ट्विट कमाल खानने केले आहे. काही दिवसांपूर्वी त्याने एक पोल केला होता. सलमान की सोनू रुपेरी पडद्यावर तुम्हाला कोणाला पाहायचेय? या पोलचा निकाल सोनू सूदच्या बाजूने लागला आहे. या निकालाच्या आधारावर कमाल खानने हे ट्विट केले आहे. त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

सोनूने महाराष्ट्र सरकारकडून विशेष परवानगी घेऊन काही गाड्यांची सोय केली आहे. या गाड्यांमार्फत महाराष्ट्रातील मजूरांना त्यांच्या गावी नेऊन सोडले जात आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही सोय तो विनामुल्य देत आहे. “शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही.” असं त्याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. आनंदाची बाब म्हणजे या वाक्याचे तो तंतोतंत पालन करत आहे. त्याच्या मदतीमुळे मजुरांना त्यांच्या गावी सोडण्याचा महाराष्ट्र सरकारवरचा भार काही प्रमाणात कमी झाला आहे असे म्हटले जात आहे. यापूर्वी सोनुने एक हजार ५०० PPE किट्सची मदत केली होती. तसेच आपले हॉटेल करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खुले करुन दिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 9:22 am

Web Title: sonu sood salman khan kamaal r khan mppg 94
Next Stories
1 …म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मानले सलमान खानचे आभार
2 या मालिकेने तेजस्विनीच्या पाठीवर दिली आयुष्यभराची खूण; शूटिंगदरम्यानचा ‘तो’ किस्सा
3 “हे घर नाही तर स्वर्ग”; कंगनाने बहिणीसाठी तयार केलं आलिशान घर
Just Now!
X