अभिनेता सोनू सूदने केलेली मदत आणि ही मदत करताना दिसणारा त्याचा नम्र स्वभाव असंख्य लोकांची मनं जिंकतोय. एकीकडे लॉकडाउनमुळे अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवण्याचं काम सोनू सूद करतोय. तर दुसरीकडे सोशल मीडियाद्वारे तो चाहत्यांच्या सतत संपर्कात राहतोय. नेटकऱ्यांच्या साधासुध्या प्रश्नांना किंवा ट्विटला तो ज्याप्रकारे उत्तर देतोय, ते पाहून अनेकजण त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

नुकत्याच एका नेटकऱ्याने सोनू सूदला आता यापुढे सोनू सर म्हणा, असं ट्विटरवर म्हटलं. त्यावर सोनू सूदने नेटकऱ्याला उत्तर देत म्हटलं, ‘सर म्हटल्यावर नातं दूरचं होतं. मला ‘ओय सोनू’ असं म्हटलं तरी चालेल.’ सेलिब्रिटी असूनसुद्धा सोनू सूदने सर्वसामान्यांप्रमाणे वावरून, त्यांची मदत करून खऱ्या आयुष्यात ‘हिरो’ बनला आहे.

आणखी वाचा : रणवीरच्या ‘या’ टोपीच्या किंमतीत तुमची संपूर्ण उन्हाळ्याची होईल शॉपिंग 

जोपर्यंत मी शेवटच्या स्थलांतरिताला घरी पोहोचवणार नाही, तोपर्यंत मदतकार्य सुरूच ठेवेन, असं आश्वासन त्याने लोकांना दिलं आहे. सोनू सूदच्या या नि:स्वार्थ कामाचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. शनिवारी सोनू सूदने राज्यपालांची भेट घेतली. तेव्हा राज्यपालांनीही सोनू सूदच्या कामाचं तोंडभरून कौतुक केलं.