सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेला अभिनेता म्हणजे सोनू सूद. स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवण्यासाठी सोनू सूद बसेसची व्यवस्था करत आहे. आतापर्यंत त्याने अनेकांची मदत केली असून त्याच्या मदतीचा ओघ सुरूच आहे. पडद्यावर खलनायक साकारणारा सोनू खऱ्या आयुष्यात हिरो ठरत असल्याची भावना प्रत्येकजण व्यक्त करत आहे. ट्विटरच्या माध्यमातून सोनू सूद चाहत्यांच्या संपर्कात आहे. एका चाहत्याच्या ट्विटला उत्तर देताना सोनू सूदने अनेकदा त्याचं नाव बदलण्याचा विचार केल्याचा खुलासा केला.
सोनू नावाच्याच व्यक्तीने हे ट्विट केलं. ‘माझंसुद्धा नाव सोनू आहे. सोनू नाव असलेले लोक खूप बिघडलेले असतात असं माझी मावशी म्हणायची आणि माझ्या संपर्कात आलेले सर्व सोनू नावाचे व्यक्ती तसेच होते. पण आता आई स्वत: म्हणते की, बघ सोनूने काय करून दाखवलं. भावा तुला सलाम, एका सोनूकडून दुसऱ्या सोनूला’, असं चाहत्याने ट्विटरवर लिहिलं.
भाई। मुझे भी बोलते थे.. सोनू सूद किसी ऐक्टर का नाम कैसे हो सकता है कई बार सोचा चेंज करलूँ। फिर सोचा रहने दो। जब सोनू यहाँ तक लाया है। आगे भी ले जाएगा https://t.co/16RzoGE09f
— sonu sood (@SonuSood) May 27, 2020
या ट्विटवर सोनू सूद म्हणाला, ‘भाई, मला पण लोक असंच बोलायचे. सोनू सूद हे अभिनेत्याचं नाव कसं होऊ शकतं? अनेकदा नाव बदलण्याचा विचार केला. पण म्हटलं जाऊ दे. जर सोनू या नावाने इथपर्यंत आणलं तर पुढेसुद्धा घेऊन जाईल.’
स्थलांतरित मजुरांसाठी सोनू सूद देवाप्रमाणे धावून आला आहे. लॉकडाउनचा फटका रोजंदारीवर काम करणाऱ्या या मजुरांना मोठ्या प्रमाणावर बसला. हातात काम आणि पोट भरायला जेवण मिळत नसल्याने अखेर या मजुरांनी पायीच गाव गाठण्याचा निर्णय घेतला. अशा मजुरांना गावी सुखरुप पोहोचवण्याचं काम सोनू सूद करतोय.