News Flash

स्थलांतरित मजुरांसाठी सोनू सूदने शेअर केला आणखी एक नंबर

गेल्या काही दिवसांपासून तो स्थलांतरित मजुरांची मदत करत आहे.

लॉकडाउनमुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक स्थलांतरित मजुरांचे हाल होत असल्यामुळे त्यांनी आपापल्या घरी परतण्याचा निर्णय घेतला. मात्र लॉकडाउनमुळे त्यांना चालत घरी जावे लागत आहे. त्यामुळे या मजुरांना घरी पोहोचवण्यासाठी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद आणि त्याच्या संपूर्ण टीमने मदतीचा हात पुढे केला आहे. सोनूने ट्विटरद्वारे मजुरांशी संपर्क साधला होता. पण आता सोनू सूदने त्याचा नंबर दिला आहे.

नुकताच सोनू सूदने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांने, ‘माझे प्रिय मजुरकामगार, जर तुम्ही मुंबईत असाल आणि तुम्हाला तुमच्या घरी परत जायचे असेल तर कृपया खाली दिलेल्या नंबरवर फोन करा. 18001213711 तसेच तुमचे नाव आणि पत्ता व्हॉट्सअॅप करा. 9321472118 या नंबरवर फोन करुन तुम्ही किती लोक आहात हे कळवा आणि तुम्ही सध्या कुठे आहात हे देखील कळवा’ असे म्हटले आहे.

‘मला तुम्ही हे देखील सांग की तुम्ही कुठे जाऊ इच्छिता. मी आणि माझी टीम तुमची मदत करु इच्छितो. मी तुमची नक्की मदत करेन. माझी टीम लवकरात लवकर तुमच्याशी संवाद साधेल. धन्यवाद’ असे त्याने ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे.

सध्या सोनू सूद करत असलेल्या कार्याची सर्वचजण प्रशंसा करत आहेत. सोनूने महाराष्ट्र सरकारकडून विशेष परवानगी घेऊन काही गाड्यांची सोय केली आहे. या गाड्यांमार्फत महाराष्ट्रातील मजूरांना त्यांच्या गावी नेऊन सोडले जात आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही सोय तो विनामुल्य देत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2020 2:00 pm

Web Title: sonu sood shared number for the help of migrant workers avb 95
Next Stories
1 ऐश्वर्याला टोमणा मारणाऱ्या दिग्दर्शकाला बिग बींनी दिले उत्तर
2 “नेहरुंचे विचार आजही देशासाठी लागू”, देशाच्या पहिल्या पंतप्रधानांना दिग्दर्शकाचं अभिवादन
3 “प्रियांकाचा तो चित्रपट कंटाळवाणा”; पामेलाने ‘देसी गर्ल’ची उडवली खिल्ली
Just Now!
X