लॉकडाउनच्या काळात बेरोजगार झालेल्या मजुरांना मदत करणाऱ्या अभिनेता सोनू सूदचे अनेक फोटो आणि व्हिडीओज तुम्ही पाहिले असतील. हे फोटो पाहून तुम्ही त्याच्यावर कौतुकाचा वर्षावही केला असेल. परंतु यावेळी सोनूचा एक चकित करणारा फोटो सध्या व्हायरल होत आहे. करिअरच्या सुरुवातीला तो कसा दिसत होता? हे आपल्या चाहत्यांना दाखवण्यासाठी त्याने एक फोटो पोस्ट केला आहे. २३ वर्ष जुना हा फोटो पाहून तुम्ही देखील चकित व्हाल.
अवश्य पाहा – “मराठी प्रेक्षकांनाच मराठी चित्रपट पाहायचे नाहीत”; महेश मांजरेकर संतापले
सोनू सूदने वाढदिवसाच्या निमित्ताने हा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. हा फोटो १९९७ सालचा आहे. “त्यावेळी मी अभिनेता होण्याची हिंमत केली होती” अशा आशयाची कॉमेंट त्याने या फोटोवर लिहिली आहे. २३ वर्ष जुना हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अवश्य पाहा – Sushant Suicide Case: “असत्याचा पराभव निश्चित”; अभिनेत्याचं रियाच्या वकिलांना आव्हान
सोनू सूदने करोनाच्या काळात गरीब मजुरांची प्रचंड मदत केली आहे. देशभरातील शेकडो मजुरांना आणि विद्यार्थांना ट्रेन व बसच्या माध्यमातून त्यांच्या गावी पोहोचवले. सोनूने महाराष्ट्र सरकारकडून विशेष परवानगी घेऊन काही गाड्यांची सोय केली. या गाड्यांमार्फत महाराष्ट्रातील मजूरांना त्यांच्या गावी नेऊन सोडले जात आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही सोय तो विनामुल्य देत आहे. “शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही.” असं त्याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. आनंदाची बाब म्हणजे या वाक्याचे तो तंतोतंत पालन करत आहे. त्याच्या मदतीमुळे मजुरांना त्यांच्या गावी सोडण्याचा महाराष्ट्र सरकारवरचा भार काही प्रमाणात कमी झाला असे म्हटले जात आहे. यापूर्वी सोनुने एक हजार ५०० PPE किट्सची मदत केली होती. तसेच आपले हॉटेल करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खुले करुन दिले होते.