करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. आतापर्यंत देशभरातील लाखो लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. नुकतेच बिहारमध्ये प्रचारात व्यस्त असलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना देखील करोनाची लागण झाल्याचं निदान झालं आहे. स्मृती इराणी यांनी ट्विट करून ही माहिती दिली. दरम्यान त्यांच्या या ट्विटवर अभिनेता सोनू सूद याने प्रतिक्रिया दिली आहे. “स्मृतीजी तुम्ही स्वत:ची काळजी घ्या अन् लवकरात लवकर बऱ्या व्हा. आम्ही तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहोत.” अशा आशयाचं ट्विट करुन सोनूने करोनावर मात करण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अवश्य पाहा – ‘बिहार प्रचारात माझ्यावर बलात्कार झाला असता’; अमिषा पटेलने प्रकाश चंद्रांवर केला आरोप

अवश्य पाहा – ‘या अभिनेत्रीला माझ्या मांडीवर बसवायचो; सलमानच्या प्रश्नावर अभिनेत्याचं वादग्रस्त विधान

गेल्या आठवड्यात स्मृती इराणी बिहारच्या प्रचाराच्या रणधुमाळीत व्यस्त होत्या. दहापेक्षा अधिक प्रचारसभांना त्यांनी संबोधित केलं होतं. दरम्यान, आज त्यांचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. “असं कधी कधीच होत की, जेव्हा काही सांगायचं असेल तर मला शब्द शोधावे लागतात. त्यामुळे साधारण हे साधारणच ठेवते. मला करोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे. जे लोक माझ्या संपर्कात आलेले आहेत, त्यांना विनंती आहे, स्वतःची करोना चाचणी आवश्य करून घ्यावी,” असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.

बिहार विधानसभेची निवडणूक २८ ऑक्टोबर, ३ आणि ७ नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून १० नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केला जाईल. करोना संकटकाळात देशात होणारी ही पहिली निवडणूक आहे. या निवडणुकीत जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची महाआघाडी उभी राहिली आहे. तर, या निवडणुकीच्या निमित्ताने तेजस्वी यादव आणि चिराग पासवान या लालू यादव आणि रामविलास पासवान या नेत्यांच्या मुलांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.