करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीत अभिनेता सोनू सूद याने गरीबांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. देशभरातील शेकडो मजुरांना त्याने रोजगार मिळवून देण्यासाठी मदत केली. शिवाय अलिकडेच त्याने गरीब विद्यार्थांच्या शिक्षणासाठी एका स्कॉलरशिपची देखील घोषणा केली. त्याच्या या दानशुरपणाची सर्वत्र स्तुती होत आहे. एका चाहत्याने तर त्याचं कौतुक करण्यासाठी आपल्या हॉटलचं जुनं नाव बदलून चक्क सोनू सूद ठेवलं आहे. चाहत्याच्या या कृतीवर सोनूने देखील त्याला भन्नाट रिप्लाय दिला आहे.

अवश्य पाहा – कोटी कोटींची उड्डाणे… ‘बिग बॉस’च्या आशीर्वादाने करोडपती झालेले सेलिब्रिटी

अवश्य पाहा – शाहरुख खानला मारलं म्हणून गुलशन ग्रोव्हर यांना ‘या’ देशाने नाकारला व्हिसा

“हे आहेत हैदराबादमधील श्रीयुत अनिल कुमार. यांनी आपल्या चायनीस हॉटेलला सोनू सूद यांचं नाव दिलं आहे. हे म्हणतात यांनी खरा देव कधी पाहिलेला नाही पण यांची खात्री आहे की ईश्वर नक्कीच सोनू सारखाच दिसत असणार.” अशा आशयाचं ट्विट करुन एका नेटकऱ्याने या हॉटेलबाबत सोनूला सांगितलं. यावर त्याने देखील “मला या हॉटेलमध्ये ट्रीट मिळेल का?” अशी गंमतीशीर प्रतिक्रिया दिली. हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – युपी पोलिसांनी राहुल गांधींवर केलेल्या लाठीचार्जवर स्वरा भास्कर संतापली, म्हणाली…

सोनू सूदने लॉकडाउनच्या काळात विविध ठिकाणी अडकलेल्या देशभरातील शेकडो मजुरांना आणि विद्यार्थ्यांना बस आणि ट्रेनच्या माध्यमातून त्यांच्या गावी पोहोचवलं आहे. शिवाय त्यांच्या रोजगारासाठीही तो प्रयत्न करत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही सोय तो विनामुल्य देत आहे. “शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही.” असं त्याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. आनंदाची बाब म्हणजे या वाक्याचे तो तंतोतंत पालन करत आहे. यापूर्वी सोनुने १५०० PPE किट्सची मदत केली होती. तसेच आपले हॉटेल करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खुले करुन दिले होते.