News Flash

सोनू सूदने ‘त्या’ चाहत्याला दिलं सरप्राइज; स्वत:च झाला आचारी

सोनू सूदला पाहून चाहता झाला थक्क

खलनायिका भूमिका ते सर्वसामान्यांसाठी सुपरस्टार असा प्रवास करणारा अभिनेता सोनू सूद हे नाव साऱ्यांच्याच परिचयाचं आहे. लॉकडाउनच्या काळात सोनू सूदने अनेक गरजुंना मदतीचा हात पुढे केला. बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास मदत केली. त्यामुळे सोनू सूद अनेकांसाठी सुपरस्टार आहे. विशेष म्हणजे लॉकडाउनमध्ये सुरु झालेलं त्याचं समाजकार्य अजूनही अव्याहतपणे सुरु आहे. यामध्येच तो अनेकदा त्याच्या चाहत्यांना विविध माध्यमातून आश्चर्याचा धक्का देत असतो. अलिकडेच त्याने एका चाहत्याच्या फूडस्टॉलवर जात त्याला सरप्राइज दिलं आहे.

अलिकडेच सोनू सूदने हैदराबाद येथील एका स्ट्रीट फूडवर जात एग फ्राइड राइस आणि मंच्युरिअनवर ताव मारल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे या स्टॉलच्या ओनरला सोनू सूदकडूनचं व्यावसाय उभा करण्याची प्रेरणा मिळाली होती. त्यामुळे सोनू सूदला त्याच्या स्टॉलवर आल्याचं पाहून तो अवाक् झाला.

“अनिल नावाच्या एका तरुणाने फास्ट फूडची गाडी सुरु केल्याचं माझा कानावर आलं होतं. त्यामुळे त्याच्या हातचे पदार्थ खाण्याची माझी इच्छा होती”, असं सोनू सूद म्हणाला. तर,” सोनू सूद यांना समोर पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांच्याकडूनच मला हा स्टॉल सुरु करण्याची प्रेरणा मिळाली होती. तरुणांना पायावर उभं राहण्याची प्रेरणा त्यांनीच सगळ्यांना दिली”, असं अनिल म्हणाला.

दरम्यान, अभिनेता सोनू सूद गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून सातत्याने गरजुंची मदत करत आहे. आतापर्यंत त्याने अनेकांना आर्थिक मदत केली आहे. तर काहींना व्यावसाय उभारण्याची प्रेरणा दिली आहे. सोबतच त्याने अनेकांचा वैद्यकीय आणि शैक्षणिक खर्चदेखील केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2020 12:55 pm

Web Title: sonu sood visit hyderabad and eat chinese food at roadside stall ssj 93
Next Stories
1 सलमान -रेमोमधील वादावर पडदा? रेमोच्या पत्नीने मानले भाईजानचे आभार
2 ख्रिसमससाठी प्रियांकाची खास शॉपिंग; जॅकेटची किंमत ऐकून व्हाल थक्क!
3 “माझ्या शुभेच्छा फक्त त्यांनाच, जे…,”कंगनाच्या ख्रिसमसच्या खोचक शुभेच्छा
Just Now!
X