News Flash

Web Series : एका प्रेमळ जोडप्याची कथा घेऊन येत आहे ‘द गुड व्हाइब्ज’

ही सीरिज विनोदी अंगाने जाणारी असली तरीही हृदयस्पर्शीदेखील आहे.

'द गुड व्हाइब्ज'

प्रेक्षकांचा वेब सीरिजना मिळणारा प्रतिसाद पाहता आता बरेच नवनवीन विषय त्यातून मांडले जाऊ लागले आहेत. एका प्रेमळ जोडप्याची कहाणी घेऊन ‘द गुड व्हाइब्ज’ ही वेब सीरिज ‘सोन लिव’वर प्रदर्शित झाली आहे. नवीन कस्तुरिया आणि मानवी गग्रू यांच्या प्रमुख भूमिका यात आहेत.

ही सहा भागांची वेब सिरीज असून यात प्रेमळ जोडप्याची हळूवार उलगडत जाणारी गोष्ट आहे. त्यांचा समाजाच्या अपेक्षांशी होणारा सामना यात पाहायला मिळणार आहे. ही सीरिज विनोदी अंगाने जाणारी असली तरीही हृदयस्पर्शीदेखील आहे. द गुड व्हाइब्ज सीरिजचा पहिला भाग ८ ऑगस्ट पासून सोनी लिव आणि लग्रों इंडियाच्या यूट्यूब चॅनेलवर सुरू झाला आहे.

एलआयक्यूव्हीडी एशिया या नव्या पिढीच्या कम्युनिकेशन कंपनीतर्फे आणि बोहमेन फिल्मतर्फे या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 4:04 pm

Web Title: sonyliv and legrand innovate to entertain with the good vibes
Next Stories
1 Batti Gul Meter Chalu trailer: वीजचोरीचा मुद्दा मांडणारा ‘बत्ती गुल मीटर चालू’
2 ‘तेरा दिवस प्रेमाचे’ मधून गंभीर विषय विनोदी पद्धतीने रंगमंचावर येणार
3 Gujarati Ventilator Poster : ‘अखेर मातृभाषेतील चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली’
Just Now!
X