18 September 2020

News Flash

सूरज पांचोली ‘सॅटेलाइट शंकर’ची पूर्ण कमाई देणार लष्कराला

या चित्रपटाचे शूटिंग चीन बॉर्डर जवळील हिमाचल आणि पंजाब येथे झाले आहे

सूरज पांचोली 'सॅटेलाइट शंकर'ची पूर्ण कमाई देणार लष्कराला

अभिनेता सूरज पांचोलीने ‘हीरो’ चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. परंतु त्या चित्रपटानंतर सूरज रुपेरी पडद्यापासून गायबच झाला होता. आता लवकरच तो ‘सॅटलाइट शंकर’ या चित्रपटात झळकणार असून ही चाहत्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे. तसेच चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता चित्रपटाशी संबंधित आणखी एका बातमी समोर आली आहे.

‘सॅटलाइट शंकर’ या चित्रपटातून जितकी कमाई होणार आहे ती संपूर्ण कमाई सूरज लष्कराला देणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग चीन बॉर्डर जवळील हिमाचल आणि पंजाब येथे झाले आहे. या परिसरातील एका आर्मी कॅम्पला सूरज पांचोली त्याच्या या चित्रपटाची कमाई मदतनिधी म्हणून देणार आहे. सूरज पांचोलीचा ‘सॅटलाइट शंकर’ हा चित्रपट येत्या जुलै महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

सूरज पांचोलीचा ‘हीरो’ हा चित्रपट दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. ‘सॅटलाइट शंकर’ चित्रपटात सूरज एका लष्कर अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. देशाचे रक्षण करताना भारतीय सैनिकांना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. त्यासाठी सूरज पांचोलीने आर्मी कॅम्पला भेटही दिली होती.

चित्रपटाबद्दल सूरजने असे म्हटले की, ‘हा एक अविस्मरणीय प्रवास आणि अनुभव होता. जवानांना भेटणे, आम्ही कॅम्पच्या ठिकाणी शूटिंग करणे आणि जवानांच्या कुटुंबीयांना भेटणे हा एक अत्यंत आनंददायी अनुभव होता.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2019 3:00 pm

Web Title: sooraj pancholi to donate all his earnings from satellite shankar to an army camp
Next Stories
1 तुमच्या आवडत्या मालिकांचे पहा विशेष भाग
2 #PMNarendraModiTrailer: ‘मोदींच्या बायोपिकवर बंदीची भाजपाचीच मागणी’, मिम्स झाले व्हायरल
3 वेब सीरिजच्या दुनियेत ‘सेक्रेड गेम्स’ आणि ‘मिर्झापूर’ आजही सर्वाधिक लोकप्रिय
Just Now!
X