News Flash

Video : रणवीर सिंगने तेजस्विनीला दिलं खास दिवाळी गिफ्ट

या मेसेजमध्ये रणवीरने तेजस्विनीला 'बंड्या' अशी हाक मारली आहे.

अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत लग्न गाठ बांधणाऱ्या रणवीर अनेक तरुणींचा क्रश आहे. त्यामुळे त्याच्या भेटीसाठी अनेक तरुणी उत्सुक असतात. केवळ तरुणीच नाही तर अनेक अभिनेत्रीदेखील त्याच्या चाहत्या आहेत. या यादीमध्ये मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीतचही नावं येतं. विशेष म्हणजे रणवीरने त्याच्या या चाहतीला दिवाळीचं एक खास गिफ्ट दिल्याचं पाहायला मिळालं.

रणवीरने या दिवाळीमध्ये एका व्हिडिओच्या माध्यमातून तेजस्विनीची भेट घेत तिची यंदाची दिवाळी खास केली आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडित रणवीर सिंगची चाहती असून तिची ही गोष्ट अभिनेता सिद्धार्थ जाधवला चांगलीच माहित आहे. त्यामुळे या दिवाळीत तेजस्विनीला रणवीरची भेट घडविण्याचा निर्णय सिद्धार्थने घेत ही भेट घडवून आणली.

सिद्धार्थ सध्या ‘सिम्बा’ या चित्रपटामध्ये व्यस्त असून चित्रपटाच्या सेटवर सिद्धार्थ आणि रणवीरची चांगली मैत्री झाली आहे. या मैत्रीच्याच नात्याने त्याने रणवीरला तेजस्विनीबद्दल सांगत तिला एक मेसेज रेकॉर्ड करुन पाठवला. या मेसेजमध्ये रणवीरने तेजस्विनीला ‘बंड्या’ अशी हाक मारल्याचं पाहायला मिळत आहे.

‘सध्या मी नि:शब्द झाले आहे. रणवीरची मी खूप काळापासून चाहती आहे. आणि ही गोष्ट सिध्दुला चांगलीच माहीत होती. तो सध्या सिम्बाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. आणि अनपेक्षितपणे त्याने मला दिवाळीला खुद्द रणवीरचा माझ्यासाठीचा मेसेज रेकॉर्ड करून पाठवला’, असं तेजस्विनीने यावेळी म्हटलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2018 1:54 pm

Web Title: special diwali gift form ranveer singh to tejaswini pandit
Next Stories
1 लग्नाच्या फोटोंचे हक्क विकले, प्रियांका कमावणार कोट्यवधी
2 ‘सुपर ३०’ची धुरा कबीर खान यांच्या खांद्यावर ?
3 Video : महिला कुस्तीपटूकडून राखी सावंतला धोबीपछाड
Just Now!
X