नुकतीच  ‘एशिया पॅसिफिक वर्ल्ड २०१३’ च्या मुकुटाची मानकरी ठरलेल्या सृष्टी राणाचा हिरेजडित मुकुट जप्त करण्यात आला आहे. भारतात परतलेल्या सृष्टीने सीमाशुल्क न भरल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिका-यांनी दिली आहे.
२१ वर्षीय सृष्टी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच तेथील कस्टम अधिका-यांनी तिला अडवले. मुकुट हिरेजडीत असल्यामुळे अधिका-यांनी तिला सीमाशुल्क भरण्यास सांगितले. पण, त्यानंतर लगेचच तिचा मुकुट जप्त करण्यात आला. अशा प्रकारच्या कोणात्याही पुरस्कारावरील सीमाशुल्क माफ करण्यासाठी केंद्रीय उत्पादन आणि सीमा शुल्क मंडळाकडून (CBEC) विशेष सवलत सूचना प्राप्त करण्याची आवश्यकता असते. मात्र,  अधिसूचना न घेतल्यामुळे सृष्टीचा मुकुट जप्त करण्यात आल्याचे अधिका-यांनी सांगितले.
दक्षिण कोरियात झालेल्या स्पर्धेत अन्य ४९ स्पर्धक सुंदरींना मागे टाकून २१ वर्षीय सृष्टी राणाने ‘मिस एशिया पॅसिफिक – २०१३’ चा मुकुट पटकावला आहे.