04 June 2020

News Flash

शाहरूखच्या ‘रईस’ची सलमानच्या ‘सुलतान’शी पुढील वर्षी टक्कर?

'रईस' आणि 'सुलतान' ईदच्या काळात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे

दोन्ही चित्रपट खरंच एकाचेवेळी प्रदर्शित झाले तरी त्याचा प्रेक्षकांना फायदाच होणार आहे. त्यांचासाठी हा ईदचा नजराणाच ठरणार आहे, असेही फरहान अख्तर म्हणाला.

अभिनेता शाहरूख खानचा ‘रईस’ आणि सलमान खानचा ‘सुलतान’ हे दोन्ही चित्रपट पुढच्या वर्षी एकाचवेळी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. ईदच्या पार्श्वभूमीवर सलमान खान किंवा शाहरूख खान या दोघांपैकी एकाचा चित्रपट दरवर्षी प्रदर्शित होत असतो. मात्र, पुढच्यावर्षी या दोघांचे दोन वेगळे चित्रपट एकाचवेळी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. अद्याप प्रदर्शनासंदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही.
फरहान अख्तर याच्या एक्सेल एंटरटेन्मेंटची निर्मिती असलेला ‘रईस’ राहुल ढोलकिया यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट पुढील वर्षी ईदच्या काळात प्रदर्शित होणार आहे. त्याचवेळी सलमान खानची प्रमुख भूमिका असलेला ‘सुलतान’ही प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या संदर्भात फरहान अख्तर म्हणाला, आम्ही आमचा चित्रपट ईदच्या काळातच प्रदर्शित करणार आहोत. आता ते सुद्धा याच काळात त्यांचा चित्रपट प्रदर्शित करणार का, हे पाहावे लागेल. सलमान खानच याचा अंतिम निर्णय घेईल. दोन्ही चित्रपट एकाचवेळी प्रदर्शित झाले तरी त्याचा व्यवसायावर फारसा परिणाम होणार नाही, अशीही अपेक्षा त्याने व्यक्त केली.
दोन्ही चित्रपट खरंच एकाचेवेळी प्रदर्शित झाले तरी त्याचा प्रेक्षकांना फायदाच होणार आहे. त्यांचासाठी हा ईदचा नजराणाच ठरणार आहे, असेही तो म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2015 4:25 pm

Web Title: srks raees vs salmans sultan next year
टॅग Salman Khan
Next Stories
1 चाहत्यांना चांगले चित्रपट देणे ही माझी जबाबदारी- रणबीर कपूर
2 ‘प्रेम रतन धन पायो’ची ४०० कोटींची भरारी!
3 देव आनंद यांचे सर्वोत्तम १० चित्रपट..
Just Now!
X