News Flash

बाहुबलीचा दिग्दर्शक म्हणतो, “ऑस्कर विजेता ‘पॅरासाईट’ पाहताना मी झोपलो”

एस. एस. राजामौली यांनी 'पॅरासाईट'वर दिली प्रतिक्रिया

‘पॅरासाईट’ या चित्रपटाने संपूर्ण जगाचे लक्ष कोरियन सिनेसृष्टीकडे वळवले. या चित्रपटाने यंदाच्या ऑस्कर पुरस्कारावर आपले नाव कोरले होते. जगभरातील सिनेसमिक्षकांनी या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला. मात्र ‘बाहुबली’च्या दिग्दर्शकांना हा चित्रपट फारसा आवडलेला नाही. एस. एस. राजामौली यांना ‘पॅरासाईट’ पाहताना झोप येत होती.

द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार राजामौलींनी ‘पॅरासाईट’ बाबत निराशा व्यक्त केली आहे. “पॅरासाईटने यंदाच्या ऑस्करवर आपले नाव कोरले. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी मी उत्साही होतो. परंतु चित्रपटाने माझा अपेक्षाभंग केला. हा थोडा कंटाळवाणा चित्रपट आहे. चित्रपटाचा शेवट येण्यापुर्वीच मी झोपून गेलो.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

‘बाहुबली’ या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे राजामौली दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडिचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. सध्या त्यांच्या ‘आर. आर. आर.’ या आगामी चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी ‘पॅरासाईट’बाबत हे वक्तव्य केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2020 3:37 pm

Web Title: ss rajamouli admits he fell asleep while watching parasite mppg 94
Next Stories
1 सोशल मीडियावरील अटकेच्या मागणीनंतर सोनू निगमने केले वक्तव्य, म्हणाला
2 मदतीसाठी रजनीकांतचा ‘दरबार’ खुला ; हजारोंना पुरवणार किराणा
3 ‘लॉकडाउनच्या प्रेमात’असं म्हणत राधिका आपटेने शेअर केला बिकिनीतला फोटो
Just Now!
X