मालिका, वेब सीरिज या साऱ्या गर्दीत गेल्या काही दिवसांपासून एक नाव प्रचंड चर्चेत आहे. ते म्हणजे स्टँडअप कॉमेडियन अबिश मॅथ्यूचं. आपल्या अनोख्या विनोदी शैलीने काही प्रासंगिक विनोदांच्या बळावर अबिश सध्या बराच प्रकाशझोतात आला आहे. वेब बिश्वातही तो अग्रस्थानी आहे हे नाकारता येणार नाही. काही प्रसिद्ध विनोदवीरांच्या यादीत असणारा हा चेहरा आता मराठमोळ्या ‘भाडीपा’करांसोबतही झळकणार आहे.

विविध संकल्पनांना विनोदाची जोड देत भारतीय डिजीटल पार्टीचे कलाकार हल्लीच्या पिढीला पटणारे विनोद अगदी त्यांच्या शैलीत सादर करतात. अवघ्या काही काळातच त्यांना प्रचंड लोकप्रियताही मिळाली आहे. अशा या अतरंगी कलाकारांच्या टीममध्ये आता अबिशचंही नाव जोडलं जात आहे.

वाचा : मानधन न स्विकारताही आमिर असा कमावतो बक्कळ नफा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अबिशनेच त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन याविषयीची माहिती देत एक फोटो पोस्ट केला आहे. ‘भाऊ…मीपण मराठी’, असं म्हणत त्याने हे ट्विट केलं आहे. ज्यासोबत त्याने एक फोटोही जोडला आहे. ज्यात तो पोलिसांच्या भूमिकेत दिसत आहे. या फोटोत दिसत असल्याप्रमाणे अबिशच्या चेहऱ्यावर गंभीर भाव दिसत असले तरीही आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्याचा नेमका कोणता विनोदी अंदाज आणि मराठमोळा बाज पाहायला मिळणार, याविषयीच चाहत्यांमध्ये कुतूहल पाहायला मिळत आहे.