आजपर्यंत खलनायक म्हणजे धिप्पाड, पोट सुटलेला, दाढी-मिशा असलेला अशी काहीशी इमेज निर्माण झाली आहे. मात्र, स्टार प्रवाहच्या ‘दुहेरी’ या मालिकेनं या समजाला छेद दिला आहे. या मालिकेतील बळवंत बल्लाळ हा मराठी टेलिव्हिजनवरचा सर्वात स्टायलिश खलनायक आहे. अभिनेता अशोक शिंदे यांनी साकारलेली बळवंत बल्लाळ ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांची दाद मिळवत आहे.

मुळात बळवंत बल्लाळ या व्यक्तिरेखेचा ‘दुहेरी’ मालिकेतील प्रवेशच २०० भागांनंतर झाला. मात्र, अल्पावधीतच आपल्या स्टाईलमुळे बळवंत बल्लाळ लोकप्रिय झाला. अगदी वेशभूषेपासून ते त्याच्या वागण्या-बोलण्यात असलेली सहजता त्याचं वेगळेपण अधोरेखित करतं. हावभाव, हसणं, उठण्या-बसण्याच्या पद्धतीतून ही व्यक्तिरेखा वेगळी ठरत गेली.

Businessman pushes man off terrace of five-star hotel
..आणि व्यावसायिकाने मुलाच्या मित्राला हॉटेलच्या गच्चीवरुन ढकलून दिलं, सीसीटीव्हीत कैद झाली घटना
IPL 2024 Lucknow Super Gitans vs Gurajat Titans Match Updates in Marathi
IPL 2024: चित्त्याच्या चपळाईने बिश्नोईने टिपला झेल, सारेच झाले अवाक; पाहा व्हीडिओ
this unique way of crossing road was seen for the first time you will not stop laughing after watching video
VIDEO : … तर गाडीची काच फुटलीच म्हणून समजा; रस्ता ओलांडण्याची ‘ही’ पद्धत तुम्ही कधी पाहिली का?
rbi commemorative coins
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९० रुपयांचे नाणे लाँच, RBI ला ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गिफ्ट

‘कुठलीही भूमिका माझ्याकडे आल्यानंतर ती सकारात्मक आहे की नकारात्मक याचा मी पहिल्यांदा विचार करतो. त्यानुसार बळवंत बल्लाळचाही विचार केला. मात्र, ही भूमिका काहीशी वेगळ्या पद्धतीनं साकारावी असं मला वाटत होतं. त्यामुळे दिग्दर्शकाशी चर्चा करून काही लकबी ठरवल्या. त्याच वावरणं, त्याचे कपडे हे खलनायकापेक्षा अँटी-हिरो म्हणून उठून दिसतात. त्यामुळे या व्यक्तिरेखेला एक ग्रेस मिळाली आणि हा खलनायक स्टायलिश झाला, जो कधीच टेलिव्हिजनवर पहायला मिळाला नव्हता,’ असं अशोक शिंदे यांनी सांगितलं.

फिटनेसबाबत प्रचंड जागरुक असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. ‘नटाचं शरीर हे त्याचं माध्यम असतं. त्यामुळे आपल्या शरीराची, दिसण्याची आपण काळजी घेतली पाहिजे. आपण स्क्रीनवर दिसणार असल्यानं आपण चांगलंच दिसलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे मी रोज एक तास न चुकता व्यायाम करतो. त्याशिवाय आहारावरही लक्ष देतो. आजच नाही, गेली कित्येक वर्षे मी हे करतो आहे. चांगल्या फिटनेसमुळे मी फ्रेश राहतो. त्याचा फायदा मला भूमिका करताना होतो,’ असंही त्यांनी सांगितलं.

बळवंत बल्लाळ (अशोक शिंदे), त्याचा मुलगा विक्रम बल्लाळ (अंगद म्हसकर) आणि नातू दृश्यांत सूर्यवंशी (संकेत पथक) या तीन व्यक्तीरेखांतील नातं पुढे कसं उलगडतं, हे प्रेक्षकांना ‘दुहेरी’ या कौटुंबिक थरार मालिकेत पाहायला मिळेल.