15 August 2020

News Flash

‘मोहम्मद द मेसेंजर ऑफ गॉड’च्या प्रदर्शनावर बंदी आणा; ठाकरे सरकारची केंद्राला विनंती

या चित्रपटाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रसारण बंदीसाठी केंद्र शासनाला पत्राद्वारे विनंती

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख. (संग्रहित छायाचित्र)

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘मोहम्मद द मेसेंजर ऑफ गॉड’ या चित्रपटाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रसारण बंदीसाठी केंद्र शासनाला पत्र लिहिलं आहे. रझा अकादमी या संस्थेने राज्याच्या सायबर विभागाकडे तक्रार अर्ज केल्यानंतर यासंदर्भात माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदीनुसार त्यांनी केंद्राला पत्राद्वारे बंदीची विनंती केली आहे. हा चित्रपट २१ जुलै रोजी डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. परंतु त्यावर बंदी घालावी असे विनंतीपत्र रझा अकादमीने राज्याच्या सायबर विभागास पाठविले होते.

अनिल देशमुख यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली. ‘रझा अकादमीने महाराष्ट्र शासनाला समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारा तसेच एका विशिष्ट समाजाच्या भावना दुखावणारा ‘मोहम्मद द मेसेंजर ऑफ गॉड’ हा चित्रपट सोशल मीडिया/ओटीटी प्लॅटफॉर्मवरून बॅन करण्याच्या केलेल्या तक्रारीनुसार मी गृहमंत्री या नात्याने केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयास माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० नुसार सदर चित्रपट सोशल मीडिया/ओटीटी प्लॅटफॉर्म वर रिलीज होऊ न देण्याची पत्राद्वारे विनंती केली आहे,’ असं त्यांनी ट्विटरवर म्हटलंय.

तसेच युट्यूब, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्स अॅप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सला हा चित्रपट प्रसारित न करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी या पत्रात केली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता हे बंदी घालण्यासाठीचे विनंतीपत्र दिले असल्याची देशमुख यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 4:21 pm

Web Title: stop broadcast of film on prophet muhammad anil deshmukh to centre ssv 92
Next Stories
1 “खरा खेळ तर आता सुरु होईल”; स्वत:चे मार्क सांगून आर माधवनने केलं विद्यार्थ्यांचं कौतुक
2 म्हणून श्रद्धा कपूरने मराठीमध्ये पत्र लिहून मानले चाहत्यांचे आभार
3 झी टॉकीजवर येत्या रविवारी उघडणार ‘नागराजचा पिटारा’
Just Now!
X