News Flash

Stree box office collection: ‘स्त्री’ची १०० कोटींकडे वाटचाल

दिग्दर्शक अमर कौशिक यांनी ‘भय आणि विनोद’ यांचा परफेक्ट तडका लावून हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल याची व्यवस्था केली आहे.

श्रद्धा कपूर, राजकुमार राव

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘स्त्री’ चित्रपटाला बॉक्स ऑफीसवर आश्चर्यकारकरित्या यश मिळत आहे. अवघ्या नऊ दिवसांत ७२.४१ कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली. ‘यमला पगला दिवाना फिर से’ आणि ‘स्त्री’ एकाच दिवशी प्रदर्शित झाले. हॉरर कॉमेडी असलेला ‘स्त्री’ बॉक्स ऑफीसवर जेमतेम कमाई करेल असा अंदाज होता. मात्र हे सर्व अंदाज खोटे ठरवत या चित्रपटाने १२ दिवसांत ८२.२९ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने कमाईचा आकडा दिला आहे. ‘स्त्री’ने पहिल्या आठवड्यात ६०.३९ कोटी तर दुसऱ्या आठवड्यात २१.९० कोटी रुपये कमावले आहेत.

वाचा : माझ्या सर्व चित्रपटांवर बंदी आणा- ट्विंकल खन्ना 

‘स्त्री’ हा भयपट आणि विनोदीपट अश्या प्रकारचा चित्रपट आहे. अश्याप्रकारचे चित्रपट सहसा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत नाहीत किंवा बॉक्स ऑफीसवर घसघशीत कमाई करण्यात यशस्वी ठरत नाहीत. परंतु या चित्रपटात दिग्दर्शक अमर कौशिक यांनी ‘भय आणि विनोद’ यांचा परफेक्ट तडका लावून हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल याची व्यवस्था केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2018 11:36 am

Web Title: stree box office collection rajkummar rao shraddha kapoor film is a runaway hit
Next Stories
1 …म्हणून छोटी भूमिका असूनही दिशानं दिला चित्रपटाला होकार
2 झी मराठीवरील बाजी मालिकेत येणार नवा ट्विस्ट!
3 माझ्या सर्व चित्रपटांवर बंदी आणा- ट्विंकल खन्ना
Just Now!
X