18 September 2020

News Flash

सुभाष घई यांना दिलासा, कथाचोरीप्रकरणी दाखल झालेला गुन्हा रद्द

न्यायालयाने सुभाष घई यांच्या विरोधातील दखल घेतलेला गुन्हा रद्द केला आहे

कथा चोरुन त्यावर चित्रपट निर्माण केल्याचा आरोप चित्रपट निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई यांच्यावर करण्यात आला होता. याबाबत त्यांच्यावर न्यायालायात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. आता न्यायालयाने सुभाष घई यांच्या विरोधातील दखल घेतलेला गुन्हा रद्द केला असल्याचे समोर आले आहे.

शहरातील कथा लेखक मुश्ताक मोसीन मुबारक हुसैन सिद्दिकी यांनी १९८३ मध्ये ‘श्रीमती’ या नावाने एक चित्रपट कथा लिहिली होती. या कथेचे त्यांनी फिल्म रायटर असोसिएशनमध्ये रजिस्ट्रेशन केले होते. दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांना त्यांनी ही कथा सांगितलेली होती. त्यावर चित्रपटही होणे अपेक्षित होते. मात्र २० जुलै २००९ मध्ये त्यांनी शहरातील चित्रपटगृहात ‘पेर्इंग गेस्ट’ हा चित्रपट पाहिला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, हा चित्रपट ‘श्रीमती’ची कथा चोरून केलेला आहे. मुश्ताक मोसीन यांनी न्यायालयात खासगी तक्रार दाखल केली. प्राथमिक सुनावणी होऊन त्यात ‘पेर्इंग गेस्ट’चे निर्माते दिग्दर्शक सुभाष घई यांच्या विरोधात प्रोसेस इश्यू करण्याचेआदेश देण्यात आले होते.

या प्रकरणात ११ एप्रिल रोजी सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान ऍड सागर लड्डा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की , मुश्ताक यांनी जरी ८ नोव्हेंबर १९८३ रोजी फिल्म रायटर असोसिएशनकडे रजिस्ट्रेशन केले असले तरी, कॉपी राइट ऍक्ट खाली त्यांच्या कथेची कुठेही नोंद केलेली नाही. तसेच कथा नोंद केल्याचे त्यांच्याकडे पुरावे नाहीत, आणि कॉपी राइट ऍक्टखाली गुन्हा सिद्ध करण्यासाठी त्या ऍक्टनुसार कथेची नोंद असणे अवश्यक असल्याचे अधिकृत प्रमाणपत्रही नाही. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी मुश्ताक याची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही, तसेंच संबंधित कथा ही मुश्ताक यांची असल्याचे ते सिद्ध करू शकत नाहीत. याउलट ही कथा प्रकाश मेहता फिल्म रायटर यांच्याकडून कराराद्वारे विकत घेतली, त्यामुळे मुश्ताक यांचे म्हणणे ग्राह्य धरता येणार नाही, असा युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी घाई यांच्याविरोधतील दखल घेतलेला गुन्हा रद्द केला. घई यांच्यातर्फे सागर लड्डा, संदीप लड्डा, आणि सोनाली लड्डा यांनी काम पाहिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 11:47 am

Web Title: subhash ghai movie story copying case closed by court
Next Stories
1 श्रेयस तळपदेला पुण्यावरुन मुंबईला येताना पोलिसांनी अडवले आणि…
2 चित्रपटसृष्टीत सलमानमुळे नाही, तर स्वकर्तुत्वावर मिळतंय काम – अरबाज खान
3 PM Narendra Modi Movie Row: निर्मात्यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाहीच
Just Now!
X