अभिनेता सुबोध भावे मोठ्या तसंच छोट्या पडद्यावरही कायम ऍक्टीव्ह असतो. सोशल मिडियावरूनही तो आपल्या चाहत्यांच्या कायम संपर्कात असतो. नुकतीच त्याने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. लवकरच तो काहीतरी नवीन घेऊन येणार असल्याचं त्यातून दिसतंय.
सुबोध भावेने आपला एक फोटो सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. ज्यात तो लेन्समधून पाहताना दिसतोय. या फोटोला त्याने “ गोष्ट चौकटीत मांडायची वेळ आलीये…लवकरच” असं कॅप्शनही दिलं आहे. आता ही नवी गोष्ट काय असणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. आपण उत्सुक असल्याचं, नव्या गोष्टीची वाट पाहत असल्याचं चाहत्यांनी त्याच्या या पोस्टवर कमेंट्स करत सांगितलं आहे. अभिनेता जितेंद्र जोशीनेही “मांडा लगेच, वाट पाहतोय” अशी कमेंटही केलीय़े.
View this post on Instagram
सुबोध सध्या चंद्र आहे साक्षीला या मराठी मालिकेत काम करत आहे. तसंच लॉकडाऊनमध्ये त्याने लहान मुलांसाठी ‘सुबोध दादाची गोष्ट’ हा लहान मुलांसाठी गोष्टींचा कार्यक्रमही सुरु केला. यात तो आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून लहान मुलांना वेगवेगळ्या गोष्टी सांगतो. यालाही प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
आता ही चौकटीत मांडण्याची नवी गोष्ट सुबोध दादाच्या गोष्टीशी संबंधित असेल की सुबोधच्या चाहत्यांसाठी नवं सरप्राईझ असेल हे लवकरच कळेल अशी आशा!
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 17, 2021 12:36 pm