मोबाइल, इंटरनेट यासारख्या गोष्टींमुळे आपण दूरवर असलेल्या लोकांशी जोडले गेलो. मात्र या दोन्ही गोष्टीमुळे आपण आयुष्यातील अनेक गोष्टींना मुकलो. फोनमुळे आपण कधीही कुठेही संवाद साधण्यास यशस्वी झालो पण जवळच्या व्यक्तीशी असलेला संवादाचा धागा या गोष्टींमुळे कधी तुटत गेला हे कळलंच नाही. हेच दाखवून देणारा एक फोटो काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी ट्विट केला. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आशाताई, सुदेश भोसले आणि इतर तरुण कलाकारांसोबत बागडोग्राहून कोलकत्याला येत होत्या. आशाताईं आणि इतर मंडळी आराम करण्यासाठी एकाठिकाणी थांबली. . यावेळी आशाताई सोडल्या तर सगळेच जण आपल्या स्मार्ट फोनवर बिझी झाले. ,’ इतके उत्तम सहप्रवासी असूनही गप्पा मारायला मात्र कुणीच नाही. धन्यवाद अलेक्झेंडर ग्रॅहन बेल! असं लिहित आशाताईंनी हा फोटो शेअर केला.

सोबत असलेल्या माणसांशी बोलण्यापेक्षा स्मार्टफोनच्या दुनियेत हरवणारे लोक आहे आहे त्यांना सोबत असणाऱ्या माणसांपेक्षा या अभासी जगाचा सहवास जास्त हवाहवासा वाटतो हे एकप्रकारे आशाताईंनी आपल्या पोस्टमधून दाखवून दिले. १३ जानेवारीला आशाताईंनी हे ट्विट केलं आहे जे सोशल मीडियावर अल्पावधीतच चर्चेत आलं.