उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर अनेक कलाकारांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. त्यातलंच एक नाव म्हणजे सुदेश लहरी. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आणि विनोदवीर म्हणून तो प्रसिद्ध आहेत. आपल्या विनोदबुद्धीने अनेकांना हसवणारा हा कलाकार मात्र सध्या एका दु:खात आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करुन त्याने त्याचं दु:ख चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.

“तुम्हा सगळ्यांनाच माहित आहे माझी पत्नी ममता आणि मी दोघं मिळवून प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचा प्रयत्न करतो. पण एक कलाकार किती दु:ख सहन करतो हे कोणालाच ठावूक नसेल. आज मोठ्या हिंमतीने मी ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करत आहे. खरं तर ही गोष्ट शेअर करु नये म्हणून ही मला सतत सांगत होती. पण कदाचित ही समस्या तुम्हाला सुद्धा येत असेल. तर, आपल्याला जे हवं असतं ते मिळतंच असं नाही. विचार केला मनीचं लग्न झालं तर सूनबाई येईल आणि सुनेचं कर्तव्य पार पाडेल.पण आमच्या बाबतीत असं काही झालं नाही. सूनबाई आली पण माझ्या खाण्या-पिण्यावर बंधन आली. हिला प्रत्येक कामात अडवलं जातं. मला माहित आहे, तुमच्या यावर विश्वास नसेल. पण हे पाहा माझ्यासमोरच ती बसली आहे”, असं सुदेश म्हणाले.


पुढे ते म्हणतात, “ही सून नाही मुलगी आहे. हीने कायम मुलीप्रमाणे आमच्यावर प्रेम केलं. त्यामुळे मी हेच सांगेन की आज हिच्यामुळे आम्ही सगळे आनंदात आहोत. आम्हाला सून नाही मुलगीच मिळाली आहे. जर आपण सूनेला मुलगी मानलं तर तीदेखील आपल्याला आई-वडिलांचा दर्जा देईल.”

दरम्यान, सुदेश लहरी यांनी मस्करीच्या अंदाजात हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी सुनेची तक्रार करण्यासोबतच तिचं कौतूकदेखील केलं आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार आहे. ते अनेक कार्यक्रम, रिअॅलिटी शोमध्ये झळकले आहेत.