19 October 2019

News Flash

सनी लिओनीचा डान्स पाहून चित्रपटगृहात चाहते सैराट; पाहा व्हिडिओ

दाक्षिणात्य सुपरस्टार माम्मुटी यांच्या चित्रपटात सनीचे आयटम साँग

सनी लिओनी

सनी लिओनी हे नाव आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही परिचयाचं झालं आहे. नुकतीच ती एका मल्याळम चित्रपटात झळकली. मल्याळम सुपरस्टार माम्मुटी यांच्या ‘मधुरा राजा’ चित्रपटासाठी सनीने एक गाणं चित्रीत केलं. त्याचा व्हिडिओ सनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. चित्रपटगृहात सनीचं गाणं लागताच चाहते बेभान होऊन पडद्यासमोर नाचू लागतात.

दक्षिणेत माम्मुटी यांच्या चित्रपटांचे असंख्य चाहते आहेत. त्यांच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. माम्मुटी यांचा ‘मधुरा राजा’ हा चित्रपट दक्षिणेत फार गाजतोय. या चित्रपटात सनी लिओनीचा एक आयटम साँग आहे. चित्रपटादरम्यान जेव्हा हे गाणं आलं तेव्हा चाहते सैराट झाले. बेभान चाहते पडद्यासमोर येऊन नाचत असल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. ‘मधुरा राजा चित्रपटातील माझ्या गाण्याला चाहत्यांचा मिळणारा प्रतिसाद पाहून खूप आनंद झाला,’ अशी कॅप्शन तिने या व्हिडिओला दिली आहे.

‘मधुरा राजा’नंतर आणखी एका मल्याळम चित्रपटात सनी लिओनी भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं नाव ‘रंगीला’ असून लवकरच त्याच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. संतोष नायर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे.

 

First Published on April 15, 2019 1:55 pm

Web Title: sunny leone dance in mammootty video fans go crazy in cinema hall