20 October 2020

News Flash

वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी आमचं आयुष्य बदललं होतं; सनीची भावनिक पोस्ट

सनी लिओनी आणि तिचा पती डॅनिअल वेबर यांनी महाराष्ट्रातील लातूर येथून अवघ्या आठ महिन्यांच्या निशाला दत्तक घेतलं होतं.

निशासोबत सनी लिओनी आणि डॅनिअल वेबर, sunny leone

काही वर्षांपूर्वी सनी लिओनीने हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि पाहता पाहता तिने या कलाविश्वात आपलं असं वेगळं स्थान निर्माण केलं. कामासोबतच सनीने तिच्या खासगी आयुष्याकडेही तितकच लक्ष दिलं. आपल्या कुटुंबाला प्राधान्य देणाऱ्या सनीकडे सध्या तिन चिमुरड्यांच्या मातृत्त्वाची जबाबदारी आहे. साधारण वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी सनीच्या आयुष्यात मातृत्त्वाची पहाट झाली होती.

सनीने सोशल मीडियावर केलेली पोस्ट पाहून याचा अंदाज लावता येत आहे. ‘एक वर्षापूर्वी आजच्याच दिवशी आमचं आयुष्य बदलून गेलं होतं. आज त्या गोष्टीची वर्षपूर्ती झाली आहे. एका वर्षापूर्वीच आम्ही तुला घरी घेऊन आलो होतो. फक्त एकच वर्ष…. मला तर असं वाटतंय की तू खूप आधीपासूनच आमच्याच आयुष्यात आहेस. तू माझ्या हृदयाचा आणि आत्म्याचा अविभाज्य भाग आहेस. तू जगातील सर्वात प्रिय मुलगी आहेस, निशा कौर वेबर, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे’, असं लिहित सनीने एक सुरेख फोटो पोस्ट केला आहे. तिची ही पोस्ट पाहता, आई म्हणून तिच्या मनात नेमकं कशा प्रकारे तिच्या मनात भावनांना उधाण आलं असेल याचा अंजाज लावता येत आहे.

वाचा : चाचा- चाचींना सलाम: १३ हजार फुटांवर जवळपास ४५ वर्षे चालवतायेत ढाबा

सनी लिओनी आणि तिचा पती डॅनिअल वेबर यांनी महाराष्ट्रातील लातूर येथून अवघ्या आठ महिन्यांच्या निशाला दत्तक घेत तिचं पालकत्त्वं स्वीकारलं होतं. निशाच्या पालकत्त्वाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काही महिन्यांनी त्यांनी सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांचीही जबाबदारी घेतली. तेव्हा आता सनीच्या निशाला दोन भाऊसुद्धा भेटले असून खऱ्या अर्थाने बी- टाऊनच्या ‘बेबी डॉल’चं कुटुंब पूर्ण झालं आहे, असंच अनेकांचं म्हणणं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2018 7:22 pm

Web Title: sunny leone daniel weber life changed one year ago on this day see her post
Next Stories
1 ‘मुल्क’ सिनेमासाठी दाऊद, काँग्रेस किंवा संघाचे फंडिंग नाही-अनुभव सिन्हा
2 मी काही न बोल्लेलच बरं, असं का म्हणतेय जान्हवी?
3 स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यावर शूट होणारा पहिला मराठी चित्रपट लवकरच तुमच्या भेटीला
Just Now!
X