News Flash

सनी लिओनी शिकतेय खास युपीची हिंदी बोली

या चित्रपटाचे नाव 'कोका कोला' आहे

बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘कोका कोला’ असून हा एक विनोदी भयपट आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. सनी या चित्रपटासाठी फार मेहनत घेत असल्याचे दिसत होते.

‘कोका कोला’ हा चित्रपट उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या एका घटनेवर आधारित आहे. प्रत्येक भूमिकेला न्याय मिळून देणारी सनी तिच्या आगमी चित्रपटातील भाषेसाठी फार मेहनत घेत आहे. तीने या चित्रपटासाठी युपीच्या हिंदी बोली भाषेचे धडे घेण्यास सुरुवात केली आहे. चाहत्यांसाठी हा एक सुखद धक्काच आहे.

‘जेव्हा एखादी गोष्ट माझ्या कामाशी संबंधीत असते तेव्हा मी सर्व नव्या गोष्टी शिकण्यासाठी तयार असते. मग ती एखादी नवीन भाषाही असो. माझी ही मेहनत मला एक यशस्वी अभिनेत्री होण्यास मदत करते. तसेच नव्या गोष्टी शिकण्यात एक वेगळा आनंद असतो. सध्या मी यूपीची हिंदी बोली शिकत आहे आणि ती भाषा आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहे’ असे सनी म्हणाली.

या चित्रपटात सनी लिओनीसह गेल्या दीड वर्षांपासून रुपेरी पडद्याहून लांब असणारी, बिग बॉस फेम अभिनेत्री मंदाना करीमी देखील झळकणार आहे. तसेच ती चित्रपटात खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख अद्याप ठरलेली नाही. परंतु चाहते चित्रपटासाठी फार उत्सुक असल्याचे दिसत आहे.

सध्या सनी मल्याळम चित्रपट ‘रंगीला’च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. तसेच या चित्रपटातून सनी मल्याळम चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2019 3:54 pm

Web Title: sunny leone is learning up dialect for her upcoming movie koko kola avb 95
Next Stories
1 सलमान खान म्हणतो लग्नासाठी हेच आहे योग्य वय!
2 जाणून घ्या, इशाने का ठेवलं मुलीचं नाव ‘मिराया’ !
3 Video: ‘साहो’चा टीझरपाहून प्रेक्षकांचा झिंगाट डान्स
Just Now!
X