News Flash

‘या’ कारणामुळे सनी लिओनीला आवडतो धोनी

सनी लिओनीने आपल्या आवडत्या क्रिकेटपटूबाबतचा खुलासा केल्यामुळे सध्या ती चर्चेत आहे

‘या’ कारणामुळे सनी लिओनीला आवडतो धोनी
सनी लिओनीचा आवडता क्रिकेटपटू कर्णधार एमएस धोनी

बॉलिवूडची बेबी डॉलने म्हणजेच सनी लिओनीने काहीही केलं आणि त्याची बॉलिवूडमध्ये चर्चा झाली नाही असं होणं कठीणच. सनी लिओनीने आपल्या आवडत्या क्रिकेटपटूबाबतचा खुलासा केल्यामुळे सध्या ती चर्चेत आहे. ‘क्रिकेट वेबसाइट’ लाँच दरम्यान सनीने आपल्याला भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आवडत असल्याचे सांगितले आहे. धोनी का आवडते त्यामामागील कारणही सनीला यावेळी विचारण्यात आलं. तेव्हा ती म्हणाली की, ‘धोनी हा परिवार संभाळणारा माणूस आहे त्यामुळे मला तो आवडतो, शिवाय सोशल मीडियावरील धोनीची मुलगी झिवासोबतची धोनी केमिस्ट्री फारच क्यूट वाटते.’

सध्या अभिनेत्री सनी लिओनीकडे दोन टीव्ही मालिका आणि एक चित्रपट असल्याचे तिने सांगितले. हा चित्रपट तिच्या स्वत:च्या प्रोडक्शन हाऊसमध्ये होणार असून पुढचे काही दिवस सनी त्याच्या शुटिंगमध्ये व्यग्र असणार आहे. सनी आणखी दोन दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम करणार आहे. तिच्या या चित्रपटातील लूक आणि अभिनय पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

बॉलीवूडला आपल्या सौंदर्याची भुरळ पाडणाऱ्या सनी लिओनीने आघाडीच्या अभिनेत्रींना मागे टाकत फेसबुकवर सर्वात जास्त सर्च केल्या जाणाऱ्या अभिनेत्रीचा ताज स्वत:च्या नावे करुन घेतला होता. याआधी २०१४ मध्ये ती गुगलवर सर्वाधिक सर्च केली जाणारी व्यक्ती ठरली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2019 3:36 pm

Web Title: sunny leone picked ms dhoni as her favourite cricketer
Next Stories
1 अजय देवगणसोबत झळकणार ‘ही’ दाक्षिणात्य अभिनेत्री
2 Rohit Shetty Birthday Special : रोहित शेट्टीचे बॉक्स ऑफीस रेकॉर्ड्स
3 माझ्या माथ्यावरील ‘तो’ कलंक आता पुसला गेला – संजय दत्त
Just Now!
X