News Flash

“बॉलिवूडने एक महान नृत्यदिग्दर्शिका गमावली”; सनी लिओनीने व्यक्त केलं दु:ख

"आयुष्यातील बहुमुल्य गोष्टी त्यांनी मला शिकवल्या"

सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचं शुक्रवारी पहाटे निधन झालं. त्या ७१ वर्षांच्या होत्या. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. दरम्यान अभिनेत्री सनी लिओनी हिने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून सरोज खान यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आयुष्यातील बहुमुल्य गोष्टी त्यांनी मला शिकवल्या असं म्हणत तिने दु:ख व्यक्त केलं आहे.

“एका सुंदर धैर्यवान गुरुसोबत मला थोडासाच वेळ व्यतीत करण्याची संधी मिळाली. परंतु त्यावेळेत त्यांनी मला आयुष्यातील बहुमुल्य गोष्टी शिकवल्या. बॉलिवूडने एक महान नृत्यदिग्दर्शिका गमावली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, ही प्रार्थना!” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट लिहून सनी लिओनीने सरोज खान यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

गेल्या बऱ्याच काळापासून सरोज खान बॉलिवूडपासून दूर होत्या. परंतु २०१९ मध्ये मल्टिस्टारर चित्रपट ‘कलंक’ आणि कंगना रनौतच्या ‘मणिकर्णिकाः द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटात एक गाणं कोरिओग्राफ केलं होतं. सरोज खान या हिंदी सिनेसृष्टीतल्या नावाजलेल्या कोरिओग्राफर होत्या. एक दो तीन.. हे गाणं असो किंवा हमको आज कल है इंतजार.. या गाण्यांचं नृत्य दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. इतकंच नाही तर चोली के पिछे क्या है.. निंबुडा निंबुडा, डोला रे डोला या गाण्यांचंही नृत्य दिग्दर्शन सरोज खान यांनी केलं. मिस्टर इंडिया, चांदनी, बेटा, तेजाब, नगिना, डर, बाझीगर, अंजाम, मोहरा, याराना, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, देवदास, ताल, फिजा, स्वदेस, तनू वेड्स मनू, एजंट विनोद, रावडी राठोड, मणिकर्णिका, या आणि अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी त्यांनी नृत्य दिग्दर्शन केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 6:29 pm

Web Title: sunny leone saroj khan passes away mppg 94
Next Stories
1 १८ दिवसांपूर्वी केली होती सरोज खान यांनी शेवटची ‘ही’ पोस्ट
2 सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात अनेकांची नावं समोर आली -गृहमंत्री अनिल देशमुख
3 सावळ्या तरुणींना चित्रपटात काम का देत नाही?; शेखर कपूर यांनी दिलं रोखठोक उत्तर
Just Now!
X