News Flash

Video : सनी लिओनीला शूटिंगदरम्यान त्याने झाडली गोळी अन्..

हा व्हिडीओ एका चित्रपटाच्या सेटवरील असल्याचे दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी तिचा आगामी चित्रपट ‘कोका कोला’मुळे चर्चेत आहे. सनीचे चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता पुन्हा एकदा सनीचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. परंतु हा व्हिडीओ नेमका कोणत्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच हा व्हिडीओ सनीने शेअर न करता कोणी तिसऱ्याने शेअर केला आहे.

सनी लिओनीने तिच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सनीला एक व्यक्ती गोळी झाडत असल्याचे दिसत आहे. दरम्यान सनी जमिनीवर कोसळते. आजूबाजूला असणारे लोकं सनीला उठवण्याचा प्रयत्न करतात. परंतु सनी कोणत्याही प्रकारची हालचाल करत नसल्याचे दिसत आहे. ‘ग्राफिक वॉर्निंग… पार्ट १… आम्ही सनी लिओनीच्या वतीने हा व्हिडीओ शेअर करत आहोत जेणे करुन काल रात्री सेटवर जे काही झाले ते लोकांना कळेल’ असे कॅप्शन व्हिडीओ शेअर करत दिले आहे. हा व्हिडीओ पाहता सनीला नक्की काय झाले? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.

यापूर्वीही सनीचा ‘कोका कोला’ या विनोदी भयपटासाठी युपीच्या हिंदी बोली भाषेचे धडे घेत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ‘कोका कोला’ हा चित्रपट उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या एका घटनेवर आधारित आहे. तसेच चित्रपटाची निर्मिती महेंद्र धारीवाला करत आहेत. या चित्रपटात सनी लिओनीसह गेल्या दीड वर्षांपासून रुपेरी पडद्याहून लांब असणारी, बिग बॉस फेम अभिनेत्री मंदाना करीमी देखील झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 7:18 pm

Web Title: sunny leone shot by person video viral on internet avb 95
Next Stories
1 बलात्कार प्रकरणी आदित्य पांचोलीवर गुन्हा दाखल
2 Bigg Boss Marathi 2 : नेहाच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन
3 अखेर परागने दिली रूपालीप्रती आपल्‍या प्रेमाची कबुली
Just Now!
X