बॉलिवूडची बेबी डॉल अभिनेत्री सनी लिओनी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असते. नुकताचा सनीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये सनी तिचे जुने कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. परंतु सनीला तिला ते कपडे होत नसल्याने ती फोटोमध्ये वैतागलेली दिसत आहे.

सनी लिओनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला असून सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘मी देखील तुमच्यासारखीच एक व्यक्ती आहे. मला असे वाटले होते की हे जुने कपडे मला होतील. पण असे काही झालेच नाही’ असे मजेशीर कॅप्शन सनीने फोटो शेअर करत दिले होते. चाहत्यांना सनीचा हा फोटो आवडला असून त्यांनी या फोटोवर कमेंटचा वर्षाव केला आहे.

सनी लवकरच ‘कोका कोला’ चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या एका घटनेवर आधारित आहे. तसेच चित्रपटाची निर्मिती महेंद्र धारीवाला करत आहेत. या चित्रपटात सनी लिओनीसह गेल्या दीड वर्षांपासून रुपेरी पडद्याहून लांब असणारी, बिग बॉस फेम अभिनेत्री मंदाना करीमी देखील झळकणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख अद्याप ठरलेली नाही. परंतु चाहते चित्रपटासाठी फार उत्सुक असल्याचे दिसत आहे. सध्या सनी मल्याळम चित्रपट ‘रंगीला’च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. तसेच या चित्रपटातून सनी मल्याळम चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे.