हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता क्रिस्टोफर डेनिस यांचे वयाच्या ५२व्या वर्षी निधन झाले. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांचा मृतदेह सैन फर्नांडो येथील दरीत सापडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्रिस्टोफर गेल्या अनेक महिन्यांपासून बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना शोधण्याचा खुप प्रयत्न केला. परंतु अखेर त्यांचा मृतदेह चक्क एका दानपेटीत नग्नअवस्थेत सापडला. सध्या पोलिस या सर्व प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. निधनानंतर त्यांचे चाहते सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहेत आणि त्याच्या आत्म्यास शांती मिळो म्हणून प्रार्थना करत आहेत.

डेनिस हॉलिवूड सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जायचे. सुपरमॅन या सुपरहिरो व्यक्तिरेखेमुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळूवून दिली. परंतु त्यानंतरच्या काळात त्यांनी अनेक चढउतार पाहिले. एकेकाळी सुपस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेनिसकडे अखेरच्या काळात राहण्यासाठी घर देखील नव्हते.