News Flash

सत्य घटनांवर आधारित ‘होम’च्या माध्यमातून सुप्रिया पिळगावकरांचं वेब विश्वात प्रवेश

एकता कपूर आणि हबीब फैजल यांच्या 'होम' वेब सीरिजमध्ये सुप्रिया मुख्य भूमिका साकारत आहेत.

सुप्रिया पिळगावकर

डिजीटल प्लॅटफॉर्मचं महत्त्व वाढलं असून वेब सीरिजना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. वेब सीरिजचं विश्व दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये बॉलिवूड आणि मराठी कलाकारही भूमिका साकारण्याची रुची दाखवत आहेत. अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनीही आपला मोर्चा वेब विश्वाकडे वळवला असून आगामी ‘होम’ या सीरिजमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

एकता कपूर आणि हबीब फैजल यांच्या ‘होम’ वेब सीरिजमध्ये सुप्रिया मुख्य भूमिका साकारत आहेत. ‘इशकजादे’, ‘दो दुनी चार’ आणि ‘दावत ए इश्क’ यांसारख्या चित्रपटाची निर्मिती करणारे हबीब आता डिजीटल विश्वात आपलं नशिब आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात ही सीरिज प्रदर्शित होणार आहे.

VIDEO : सायबर क्राइमच्या सत्य घटनांवर आधारित ‘टेक केअर गुड नाइट’

‘होम’ ही वेब सीरिज एका सत्य घटनेवर आधारित असून एका सोसायटीभोवती त्याची कथा फिरते. मध्यम वर्गीयांचं घर घेण्याचं स्वप्न, त्यासाठी सुरू असणारी धडपड आणि बिल्डरच्या चुकीमुळे बेघर झालेली कुटुंबं यातून रेखाटण्यात येणार आहे. सुप्रिया यांच्यासोबतच इतरही मोठे कलाकार यात भूमिका साकारणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 6:07 pm

Web Title: supriya pilgaonkar first web series home ekta kapoor habib faisal
Next Stories
1 लवकरच छोट्या सूरवीरांची होणार सुरांशी दोस्ती
2 VIDEO : सायबर क्राइमच्या सत्य घटनांवर आधारित ‘टेक केअर गुड नाइट’
3 बिकीनीतल्या फोटोमुळे सारा खान ट्रोल; नेटकऱ्यांनी दिला धर्म बदलण्याचा सल्ला
Just Now!
X