‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासूनच यातील सेलिब्रिटी गायक आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मनं जिंकत आहेत. लोकसंगीत असो, शास्त्रीय संगीत असो वा पाश्चात्य संगीत.. या गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये कॅप्ट्न्सना तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींना एक आश्चर्याचा सुखद धक्का दिला. येत्या सोमवार आणि मंगळवारच्या भागामध्ये देखील असेच काहीसे घडले.

वाचा : अर्शीनंतर हिना खानने तोडले सामान्य ज्ञानचे तारे

येत्या आठवड्याची थीम असेल ‘वाद्य विशेष’. या भागामध्ये ‘जिम्बे’ वाद्याला भारतामध्ये नावारूपाला आणणारे तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर संगीतामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेले उस्ताद अल्लाराखा यांचे सुपुत्र आणि उस्ताद झाकीर हुसेन यांचे मोठे भाऊ सुप्रसिध्द संगीतकार तौफीक कुरेशी यांनी हजेरी लावली. सूर नवा ध्यास नवाच्या मंचावर या भागामध्ये एकाहून एक रंगतदार आणि ‘वाद्य’ ज्या गाण्याचा महत्वाचा भाग आहे अशी गाणी स्पर्धकांनी सादर केली.

वाचा : झायराच्या ‘त्या’ व्हिडिओवर राखीने उपस्थित केला प्रश्न

सूर नवा ध्यास नवाच्या मंचावर या वेळेस सूर आणि तालाची खास जुगलबंदी रंगताना पाहायला मिळेल. महेश काळेची गायिकी, तौफीकजींचे ‘जिम्बे’ हे वाद्य आणि ख्यातनाम सॅक्सोफोन वादक श्यामराजजी यांच्या जुगलबंदीने सगळे उपस्थित मंत्रमुग्ध झाल्याचे पाहायला मिळेल. ‘अलबेला सजन आयो’ यावर त्यांनी जुगलबंदी सादर करून सगळ्यांची मनं जिंकली. महेश काळे आणि तौफीक कुरेशी यांना एकत्र एकाच मंचावर ऐकण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना मिळणार आहे.