News Flash

इंजिनिअरिंग सोडून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या सुशांतविषयी काही रंजक गोष्टी

२००६मध्ये ऑस्ट्रेलिया येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याला ऐश्वर्या रायसोबत नृत्य करण्याची संधी मिळाली होती.

सुशांत सिंह राजपूत

एकेकाळी गाजलेल्या ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतील मानव म्हणजेच अभिनेता सुशांत सिंह राजपूत तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे. या मालिकेनंतर त्याचे अंकिता लोखंडेशी असलेले प्रेमसंबंध आणि त्यांचे ब्रेक-अप यामुळे तो जास्त चर्चेत आला. काही काळापूर्वी क्रिकेटपटू एम.एस.धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपटात त्याने मुख्य भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. खरंतर सुशांत याआधीपासूनच चित्रपटसृष्टीत सक्रिय होता. पण, त्याला धोनीच्या भूमिकेने एक वेगळी ओळख दिली.

छोट्या पडद्यापासून सुरु झालेला त्याचा प्रवास अगदी हेवा वाटेल असाच आहे. शिक्षण, खासगी आयुष्य आणि या कलाविश्वातील त्याची कारकिर्द या सर्वच गोष्टींमुळे सुशांतविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये कुतूहल पाहायला मिळतं. चला तर मग जाणून घेऊया त्याच्याविषयीच्या काही खास गोष्टी…

इंजिनिअरिंग सोडून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण

सुशांत सिंह राजपूत मूळचा बिहारचा असून तो दिल्लीमध्ये लहानाचा मोठा झाला आहे. ऑल इंडिया एन्ट्रन्स एक्साम देऊन त्यात सातव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या सुशांतने केमिकल इंजिनिअरींगला प्रवेशही घेतला. मात्र यामध्ये आपले मन रमत नसल्याचे लक्षात आल्यावर त्याने दुसऱ्या वर्षी हे शिक्षण सोडून दिले आणि अभिनयाच्या क्षेत्रात पुढे करियर करायचे असे ठरवले.

नृत्यातून कला क्षेत्रात प्रवेश

इंजिनिअरींगचे शिक्षण घेत असताना त्याने शामक दावरकडे नृत्याचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. २००६मध्ये ऑस्ट्रेलिया येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याला ऐश्वर्या रायसोबत नृत्य करण्याची संधी मिळाली होती.

आणि एकता कपूरने त्याला हेरले

मुंबईमध्ये नादिरा बब्बरसोबत अभिनयाच्या क्षेत्रात काम करुन एलन-अमीनकडून तो काही अॅक्शन शिकला. यावेळी एका नाटकाच्यावेळी एकता कपूर त्याठिकाणी उपस्थित होती. तिने त्याच्या टॅलेंटला हेरले आणि त्याचे नशीबच बदलले. त्यानंतर ‘पवित्र रिश्ता’मधून त्याने आपल्या छोट्या पडद्यावरील अभिनयाला सुरुवात केली आणि ‘झलक दिख ला जा’ मध्येही आपल्यातील चमक दाखवून दिली.

असे केले बॉलिवूडमध्ये पदार्पण

पवित्र रिश्ता मालिका गाजल्यानंतर सुशांतला बॉलिवूडमध्ये प्रवेश मिळाला. ‘काई पो चे’ या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवडूमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘शुद्ध देसी रोमान्स’ या यशराज फिल्म्सच्या चित्रपटातही त्याने काम केले. डिटेक्टीव्ह ब्योमकेश बक्षी आणि एम.एस.धोनी या चित्रपटांनी त्याला अभिनेता म्हणून खरी ओळख मिळवून दिली.

अंकिता आणि सुशांत

अंकिता लोखंडेसोबत त्याची पवित्र रिश्तामध्ये अतिशय चांगली केमिस्ट्री जुळली होती. हीच केमिस्ट्री प्रत्यक्ष आयुष्यातही जुळत होती. मात्र कालांतराने त्यांच्यामध्ये वाद व्हायला लागले आणि या वादांची जागा ब्रेक-अपने घेतली. त्यानंतर त्याने समोर येत माध्यमांना याबाबतचे स्पष्टकरणही दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2020 10:01 am

Web Title: sushant singh rajput birthday special from engineer to actor journey ssv 92
Next Stories
1 Photo : राणी मुखर्जीचा ‘हा’ लूक पाहून नेटकरी म्हणतात, ‘लेडी बप्पीदा’
2 योगेश सोमण यांना ‘मुक्ता’चा पाठिंबा
3 “तिचं पोट बघा,” म्हणणाऱ्या ट्रोलर्सला अनुष्का शर्माचे जबरदस्त उत्तर; म्हणाली….
Just Now!
X