03 March 2021

News Flash

‘या’ खास ठिकाणी सुशांतने खरेदी केली आहे जमीन!

विशेष म्हणजे सुशांत सध्या चर्चेत आला असून साऱ्याचं लक्ष त्याच्याकडे वेधल्याचं पाहायला मिळत आहे.

सुशांतसिंह राजपूत

छोट्या पडद्यावरुन कारकिर्दीची सुरुवात करणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूत सध्या बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक झाला आहे. सुपरहिट चित्रपट देणाऱ्या सुशांतचं सध्या मानधन वाढलं असून त्याच्या लोकप्रियतेमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. विशेष म्हणजे सुशांत सध्या चर्चेत आला असून साऱ्याचं लक्ष त्याच्याकडे वेधल्याचं पाहायला मिळत आहे.

उत्तम अभिनयाच्या जोरावर सुशांतने बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकारांच्या यादीत नाव मिळवं आहे. मात्र हळूहळू प्रगतीचा आलेख उंचावणा-या सुशांतने एका बाबतीत मात्र सा-या अभिनेत्यांना मागे टाकलं आहे. सुशांतने चक्क चंद्रावर जागा खरेदी घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

बॉलिवूडमध्ये पूर्वापार चालत आलेल्या गाण्यांच्या परंपरेमध्ये अनेक वेळा चंद्र,सूर्य, तारे यांचा उल्लेख आल्याचं पाहायला मिळतं. मात्र, प्रत्यक्षात तिथपर्यंत पोहोचणं किंवा तेथील जाग विकत घेण हे साऱ्यांनाच शक्य होत नाही. मात्र ही अशक्य गोष्ट सुशांत सिंह राजपूतने शक्य करुन दाखविल्याचं सांगण्यात येत आहे.

चंद्रावरील जमिनीचा भाग विकत घेणाऱ्या व्यक्तीला ‘मारे मस्कोवीन्स’ असं म्हटलं जात असून सुशांतने नुकताच चंद्रावरील जमीनीचा काही भाग विकत घेतला आहे. सुशांतकडे एक अॅडव्हान्स टेलिस्कोप मीड 14, LX00 असून तो या टेलिस्कोपच्या मदतीने त्याच्या मालकीच्या हक्क्याची जमीन कधीही पाहू शकतो असं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, याविषयी बोलताना त्याने त्याच्या आईच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ‘नशीब हे आपण घडवायचा असतं असं माझी आई कायमच म्हणत आली होती. आणि मी माझ्या मेहनतीवर सारं काही मिळविलं आहे. त्यामुळे मी आज  तेच आयुष्य जगत आहे’ असं सुशांतने सांगितलं. सुशांतने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेपासून केली होती. त्यानंतर मोठ्या पडद्यावर पोहोचलेल्या सुशांतने अद्याप तरी मागे वळून पाहिलेलं नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 2:48 pm

Web Title: sushant singh rajput buys land on moon
Next Stories
1 बॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान लोक अक्षरश: माझ्या पाया पडायला यायचे- देवदत्त नागे
2 अमृता पाहतेय ‘या’ चित्रपटाची आतुरतेने वाट!
3 ‘हा’ अभिनेता साकारणार सनीच्या पतीची भूमिका
Just Now!
X