‘एम.एस. धोनी’ चित्रपट फेम अभिनेता सुशांत सिंह राजपूत सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. अभिनेत्री क्रिती सनॉनशी ब्रेकअपनंतर आता त्याच्या आयुष्यात नवं प्रेम फुलतंय. सुशांतने अधिकृतरित्या जरी हे स्वीकारलं नसलं तरी आजकाल हे दोघं एकत्रच दिसतात. ‘जलेबी’ या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि सुशांत एकमेकांना डेट करत असल्याचं कळतंय. रियाने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला आणि या वाढदिवशी सुशांतने तिला महागडं प्लॅटिनम पेंडंट भेट म्हणून दिल्याचं समजतंय.

सुशांत व रिया एकत्र लडाखला गेले होते आणि त्यानंतर सुशांतने रियाच्या वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन केलं होतं. रियाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर वाढदिवस साजरा करतानाचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत.

https://www.instagram.com/p/BzZrYegnSbF/

https://www.instagram.com/p/BoBgHOlHX53/

आणखी वाचा : बॉलिवूडला रामराम केलेल्या झायराची नवीन पोस्ट; वाचा काय म्हणतेय ती..

सुशांतच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, तो सध्या ‘छिछोरे’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. तर रिया आगामी ‘चेहरे’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. ‘जलेबी’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी रियाने दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यासोबत एक फोटो पोस्ट केला होता. त्या फोटोवरून नेटकऱ्यांनी रियाला ट्रोल केलं होतं.