अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी केली जात आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर आर्थिक फसवणूकीचा आरोप केला आहे. परिणामी सुशांतच्या चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे रियावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर रियाने माध्यमांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेला आता अभिनेत्री स्वरा भास्करने पाठिंबा दिला आहे. रिया विरोधात अफवा पसरवणाऱ्या माध्यमांवर कोर्टाने कारवाई करावी अशी मागणी तिने केली आहे.

अवश्य पाहा – सुशांतनं पत्ता म्हणून दिलेला फ्लॅट आठ वर्षांपूर्वीच रियाच्या वडिलांनी घेतला होता विकत

नेमकं काय म्हणाली स्वरा भास्कर?

“रियाला एका विचित्र आणि धोकादायक मीडिया ट्रायलचा सामना करावा लागत आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकाराकडे गांभिर्याने लक्ष द्यावं. तसंच खोट्या बातम्या पसरवणाऱ्या माध्यमांवर कारवाई करावी.” अशा आशयाचं ट्विट करुन स्वराने रिया चक्रवर्तीच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अवश्य पाहा – सुशांत मृत्यू प्रकरण: संजय राऊत यांच्यावर सुशांतचं कुटुंब ठोकणार मानहानीचा दावा

सुशांत मृत्यू प्रकरण : मुंबई पोलीस आयुक्तांनी सांगितलेले १० महत्त्वाचे मुद्दे

१. सुशांत मृत्यू प्रकरणी आतापर्यंत ५६ लोकांचे जबाब नोंदवले गेले आहेत. व्यावसायिक वैर, आर्थिक व्यवहार किंवा आरोग्य अशा सर्व मुद्द्यांवरून तपास सुरू आहे.
२. सुशांत दुभंगलेलं व्यक्तिमत्त्व (bipolar disorder) या मानसिक आजाराने त्रस्त होता आणि त्यासाठी तो उपचार घेत असल्याचं उघडकीस आलं आहे.
३. कोणत्या कारणामुळे त्याचा मृत्यू झाला हा आमच्या तपासाचा विषय आहे.
४. १६ जून रोजी सुशांतचे वडील, बहीण आणि मेहुण्याचा जबाब नोंदवला गेला.
५. त्यावेळी सुशांतच्या कुटुंबीयांनी आमच्या तपासाबद्दल कोणतीच शंका उपस्थित केली नव्हती. आमच्या तपासात काही त्रुटी असल्याची तक्रारसुद्धा त्यांनी केली नव्हती.
६. सुशांतच्या मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवलेल्या ५६ लोकांमध्ये रिया चक्रवर्तीचाही समावेश आहे.
७. रियाचा जबाब दोन वेळा नोंदवला गेला. तिला पोलीस ठाण्यातही अनेकदा बोलावलं गेलं.
८. ती आता कोठे आहे, याबाबत मी वक्तव्य करू शकत नाही.
९. बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार सुशांतच्या खात्यातून १५ कोटी रुपये काढून घेण्यात आले.
१०. सुशांतच्या खात्यात १८ कोटी रुपये होते आणि त्यापैकी साडेचार कोटी रुपये अजूनही खात्यात आहेत, असं आमच्या तपासात निदर्शनास आलं. सुशांतच्या अकाऊंटमधून रियाच्या अकाऊंटमध्ये थेट पैसे ट्रान्सफर झाल्याची कोणतीही माहिती समोर आली नाही. याबाबत अजून तपास सुरू आहे.