28 September 2020

News Flash

‘सुशांत ड्रग्स घेत असता तर…’ एक्स असिस्टंटने केला खुलासा

सुशांत खरंच ड्रग्स घ्यायचा का?

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. यातच सुशांतला ड्रग्सचं व्यसन होतं अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे सध्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून याप्रकरणी तपास सुरु आहे. परंतु, सुशांत ड्रग्सचं सेवन करत नव्हता असं त्याच्या एक्स असिस्टंटने साबिर अहमद याने सांगितल्याचं आयएएनएसच्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

“मी सुशांत सरांसोबत डिसेंबर २०१८ ते फेब्रवारी २०१९ या कालावधीत काम केलं होतं. या काळा मी त्यांची अनेक कामं केली. त्यात त्यांच्या ‘सोनचिरैय्या’ या चित्रपटाच्या प्रमोशन सुरु होतं आणि त्याचवेळी त्यांच्या ‘दिल बेचारा’चं चित्रीकरणदेखील सुरु होतं. या काळात मी त्यांच्याच बरोबर होतो. त्यांचं फोटोशूट, चित्रपटांचं प्रमोशन, चित्रीकरण यासारख्या अनेक कामांमध्ये मी त्यांना मदत केली आहे. तसंच मी त्यांच्यासोबत त्यांच्या १६ व्या मजल्यावरील अपार्टमेंटमध्ये राहत होतो. फेब्रुवारी २०१९ मध्ये मी नोकरी सोडून गावी गेलो होतो. त्यानंतर जून-जुलैमध्ये मुंबईत आल्यावर सरांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण आता सरांच्या घरातील सगळं कामकाज रिया नामक व्यक्ती पाहत असून ती जुन्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यास उत्सुक नसल्याचं मला सरांच्या घरातील एका कर्मचाऱ्याकडून समजलं,”असं साबिरने सांगितलं.

आणखी वाचा- ‘ड्रग्सविषयीचे चॅट मीच टाइप केले होते’; रियाची कबुली

पुढे तो म्हणतो, “जर सुशांत सर ड्रग्सचं सेवन करत असते तर मला नक्कीच समजलं असतं. कारण मी २४ तास त्यांच्यासोबत असायचो. आता मला या प्रकरणात एमएल, एमडी किंवा अन्य अनेक अंमली पदार्थांची नाव ऐकू येत आहेत. पण जर सर ड्रग्स घेत असते तर मला या ड्रग्सची नावं नक्कीच माहित असती. मला खरंच हे सगळं ऐकून आश्चर्य वाटतंय. पण जेव्हा मी त्यांच्यासोबत होतो तेव्हा तर असं काही नव्हतं. पण मी गेल्यानंतर नेमकं काय झालं हे मला माहित नाही”.

आणखी वाचा- १७ हजारांचा इएमआय कसा भरु ? रियाच्या वक्तव्यावर सुशांतची बहीण संतापली; म्हणाली…

दरम्यान, साबिरने सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी अनेक गोष्टींचा खुलासा केला. सुशांत नैराश्यात नव्हता असंही त्याने सांगितलं. सुशांतकडे अनेक चित्रपट होते, ते सतत आनंदी असायचे आणि कायम प्रत्येकाशी प्रेमाने, आदराने बोलायचे असंही त्याने सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2020 1:17 pm

Web Title: sushant singh rajput ex assistant sabir ahmed said if sir consumed drugs i d have known ssj 93
Next Stories
1 लॉकडाउननंतर होणार शीतल अहिररावची दमदार एण्ट्री; आगामी चित्रपटाचं चित्रीकरण सुरु
2 WWE सुपरस्टार ‘बुलेट बॉब’ यांचं उपचारादरम्यान निधन
3 ‘ड्रग्सविषयीचे चॅट मीच टाइप केले होते’; रियाची कबुली
Just Now!
X