News Flash

सुशांतसाठी न्याय मागणारे आता गप्प का? फराह खानचा SSR Warriorsला सवाल

"वारे आता उलट्या दिशेने वाहतायत, सुशांतसाठी न्याय मागणारे गेले कुठे?"

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता दोन महिने उलटून गेले आहेत. सीबीआय, ईडी आणि एनसीबी मार्फत या प्रकरणाचा तपास सुरु आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान या प्रकरणावर अभिनेत्री फराह खान अली हिने प्रतिक्रिया दिली आहे. सुशांतच्या नावाखाली राजकारण सुरु आहे हे एसएसआर वॉरिअर्स गेले कुठे? असा सवाल तिने केला आहे.

अवश्य पाहा – “मुलांसाठी थाळ्या सजवतात अन् आम्हाला फेकलेले तुकडे देतात”

अभिनेता संजय खान यांनी मुलगी फराह खान अली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडींवर ती रोखठोकपणे आपली मतं मांडते. यावेळी तिने सुशांत प्रकरणावर भाष्य केलं. “सुशांतच्या नावाखाली राजकारण सुरु आहे. हे एसएसआर वॉरिअर्स गेले कुठे? पाठिंबा देण्यात स्वारस्य उरलं नाही की हवामान बदललं? काही मंडळींनी आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी सुशांतच्या नावाचा गैरवापर केला. यांनी दिवंगत व्यक्तीला देखील सोडलं नाही. हे खूपच लज्जास्पद आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन तिने एसएसआर वॉरिअर्सला उपरोधिक टोला लगावला आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – मोदींनी मानले करण जोहरचे आभार, मात्र ट्रोल होतेय कंगना रणौत

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. तसेच न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून तिला ‘न्यायालयीन कोठडी’ सुनावली आहे. अमली पदार्थ विकत घेणे, त्यासाठी अन्य आरोपींशी संगनमत करणे, याबाबत रियाविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा ‘एनसीबी’ने केला. ‘एनसीबी’चे पथक रविवारपासून रियाची चौकशी करत होते. याआधी रियाचा भाऊ शोविक, सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, नोकर दीपेश सावंत, अमली पदार्थ विक्रेता झैद विलात्रा, कैझान इब्राहिम, अब्देल बसीत परिहारसह नऊ जणांना ‘एनसीबी’ने अटक केली आहे. त्यापैकी शोविक, सॅम्युअल, दीपेश यांच्यासमोर रियाची चौकशी करण्यात आली. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचे धागेदोरे अमली पदार्थाशी जोडलेले आहेत का, याबाबतही ‘एनसीबी’कडून तपास सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 6:18 pm

Web Title: sushant singh rajput farah khan ali ssr warriors mppg 94
Next Stories
1 मोदींनी मानले करण जोहरचे आभार, मात्र ट्रोल होतेय कंगना रणौत
2 सनी लिओनीचा कंगनाला अप्रत्यक्ष टोला; म्हणाली…
3 सौंदर्याचं कारस्थान येणार का कार्तिकसमोर?
Just Now!
X