अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येला एक महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला असून पोलिसांचा तपास अद्याप सुरु आहे. १४ जून रोजी सुशांतने वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांत सिंह तणावात असल्याने आत्महत्या केल्याचा दावा वारंवार केला जात आहे. पोलीस त्यादृष्टीने चौकशीही करत आहेत. दरम्यान अनेकांनी सुशांत सिंहच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. यामध्ये आता सुशांत सिंहची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचाही समावेश झाला आहे.
रिया चक्रवर्तीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सीबीआय चौकशी करण्याची विनंती केली आहे. इतकं मोठं पाऊल उचलण्यासाठी सुशांतवर कोणता दबाव होता हे मला जाणून घ्यायचं असल्याचं रियाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
रिया चक्रवर्तीने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “आदरणीय अमित शाह सर…मी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती…सुशांत सिंगच्या निधनाला एक महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला आहे. माझा सरकारवर पूर्ण विश्वास आहे. पण न्याय मिळावा यासाठी आपण सीबीआय चौकशीचा आदेश द्यावा अशी हात जोडून विनंती आहे. हे पाऊल उचलण्यासाठी सुशांतवर कोणता दबाव होता हे मला जाणून घ्यायचं आहे”. रियाने आपल्य ट्विटमध्ये सत्यमेव जयते हॅशटॅगही वापरला आहे. रियाने ही पोस्ट आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही केली आहे.
Respected @AmitShah sir ,
I’m sushants Singh Rajputs girlfriend Rhea chakraborty,it is now over a month since his sudden demise
I have complete faith in the government, however in the interest of justice , I request you with folded hands to initiate a CBI enquiry..part 1 ..— Rhea Chakraborty (@Tweet2Rhea) July 16, 2020
Part 2.. I request you with folded hands to initiate a CBI enquiry into this matter . I only want to understand what pressures , prompted Sushant to take this step.
Yours sincerely #satyamevajayate @AmitShah sir— Rhea Chakraborty (@Tweet2Rhea) July 16, 2020
दरम्यान रियाने आपल्याला बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याच याआधी एका पोस्टमध्ये सांगितलं आहे. ‘मला मारेकरी म्हटलं.. मी गप्प बसले, अर्वाच्च भाषेत मला शिवीगाळ केली.. मी गप्प बसले, मला फायदा उचलणारी म्हटलं.. मी गप्प बसले. पण म्हणून मी आत्महत्या केली नाही तर माझ्यावर बलात्कार किंवा हत्या करण्याचा कोणता अधिकार तुम्हाला मिळतो? तू जे म्हणालीस त्या गोष्टीची गंभीरता तरी तुला ठाऊक आहे का? हा गुन्हा आहे आणि कायद्यानुसार कोणाचाही, मी पुनरुच्चार करते की कोणाचाही अशाप्रकारे छळ होऊ नये. आता पुरे झालं’, असं लिहित रियाने सायबर क्राइम सेलला कारवाईची विनंती केली आहे.
View this post on Instagram
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
सुशांत आणि रिया एकमेकांना डेट करत होते. वांद्रे येथील घरात ते एकत्र राहत होते असंही सांगितलं जात आहे. सुशांत सिंहला कूपर रुग्णालयात नेण्यात आलं होतं तेव्हा रिया तिथे पोहोचली होती. पण त्याच्या अंत्यसंस्काराला ती हजर नव्हती. पोलिसांनी रियाचा जबाबदेखील नोंदवला आहे. रियाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सुशांतने यशराज फिल्मसोबतचे आपले करार रद्द केले होते आणि आपल्यालाही करण्यास सांगितलं होतं.