अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि क्रिती सनॉन आगामी ‘राबता’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाशिवाय या दोघांच्यात प्रेम बहरत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून बॉलिवूड वर्तुळात रंगताना दिसत आहेत. सुशांत आणि अंकिता लोखंडे यांच्यातील ब्रेकअपनंतर या चर्चेला सुरुवात झाली. दोघे अनेकदा एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसले. मात्र, दोघांनीही नात्याला चांगल्या मैत्रीचे नाव दिले.

नुकतेच ‘फिल्म फेअर’ मासिकात या दोघांना बॉलिवूडमधील ‘लव्ह बर्ड’ असे संबोधण्यात आले आहे. यावर सुशांतने मासिकाचे आभार मानले आहेत. ‘फिल्म फेअर’ मासिकाने बॉलिवूडमधील ‘लव्ह बर्डस्’ म्हणून सुशांत आणि क्रितीला पसंती दिली आहे. मासिकात मिळालेल्या प्रसिद्धीवर सुशांतने प्रतिक्रिया दिली आहे. सुशांतने मासिकातील पोस्टर इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले. तसेच त्याने त्याखाली ‘फिल्म फेअर लव्ह बर्ड’ ?? खरचं ?? मला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद’, असे उपहासात्मक कॅप्शनही लिहिले आहे. सुशांतने मासिकाला दिलेल्या या प्रतिक्रियेवरुन तो नात्याला अजूनही मैत्रीतच जोखताना दिसतोय.

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Man Commits Suicide, Killing Second Wife , Killing Son, Immoral Relationship, nagpur crime, Immoral Relationship crime, nagpur news, murder news, crime news, marathi news,
नागपूर : अनैतिक संबंधामुळेच घडले हत्याकांड, तिघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

https://www.instagram.com/p/BUWP7pZgg0i/

‘हिरोपंती’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या क्रिती सनॉनने फार कमी वेळात एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. बॉलिवूडमध्ये स्थिरावलेल्या या नायिकेसोबत बॉलिवूडमधील काही अभिनेत्यांचे नाव जोडले गेले होते. सध्याच्या घडीला सुशांतचे नाव तिच्यासोबत जोडले जात आहे. याच पार्श्वभूमीवर ‘वोग इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिला सुशांतसोबतच्या नात्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना ती म्हणाली होती की, तुम्ही ठरवून कोणत्याही नात्याची सुरुवात करु शकत नाही, सध्यातरी मी ‘सिंगल’च आहे. मी कोणालाही डेट करत नाहीये.’ असे सांगून तिने सुशांतसोबतच्या प्रेमसंबंधीच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला होता.